Home /News /national /

हे Challenge घ्याच ! उठाबशा काढा, फ्री तिकीट मिळवा; कसं? त्यासाठी Video पाहा

हे Challenge घ्याच ! उठाबशा काढा, फ्री तिकीट मिळवा; कसं? त्यासाठी Video पाहा

रेल्वे स्टेशनवर (Railway station) असं अनोखं फिटनेस मशीन (fitness machine) बसवण्यात आलं आहे, ज्या मशीनसमोर उठाबशा (Squat) काढल्याने फ्लॅटफॉर्म तिकीट मोफत (free platform ticket) मिळतं.

    दिल्ली, 21 फेब्रुवारी : प्रत्येक कामासाठी मशीन्स आल्यानंतर लोकं आळशी बनत चाललेत, अजिबात हालचाल करत नाही. असं असताना आता याच लोकांना फिट ठेवण्यासाठी रेल्वेने (railway) मात्र एक भन्नाट कल्पना आणली आहे. मशीनसमोर उठाबशा (Squat) काढा आणि मोफत प्लॅटफॉर्म तिकीट (free rail platform ticket)  मिळवा, असं चॅलेंज रेल्वेमंत्र्यांनी दिलं आहे. दिल्लीतील (delhi) आनंद विहार रेल्वे स्टेशनवर (Anand Vihar Railway Station) असं अनोखं फिटनेस मशीन (fitness machine) बसवण्यात आलं आहे. या मशीनसमोर उठाबशा काढल्याने फ्लॅटफॉर्म तिकीट मोफत मिळतं. 'फिटनेससह बचत'ही असं म्हणत रेल्वेमंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी हा व्हिडिओ ट्विट केला आहे. रेल्वेमंत्र्यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. की या Squat kiosk मशीनसमोर उभं राहून काही लोकं स्क्वॅट करत आहेत. मशीन सेन्सर किती स्क्वॅट मारले ते तपासतं आणि ठरलेला स्कोअर गाठताच मशीनमधून तिकीट बाहेर येते. रशियन रेल्वे स्टेशनवरील 'squat and ride' मशीन पाहिल्यानंतर भारताची राजधानी दिल्लीत असा उपक्रम राबवण्याचा विचार करण्यात आला आणि तो प्रत्यक्षात आणलाही गेला.  ज्याला नागरिकांनीही भरभरून प्रतिसाद दिला आहे. फ्री प्लॅटफॉर्म तिकीट देऊन रेल्वे प्रशासन नागरिकांना फिट ठेवतं आहे, फिट इंडिया (fit india) मोहिमेअंतर्गत रेल्वेमंत्र्यांनी हा अनोखा उपक्रम राबवला आहे. त्यामुळे ट्विटर युझर्सनी या  Fit India Squat Machine असं म्हटलं आहे. फिट इंडिया (fit india) ही पंतप्रधान मोदी यांनी सुरू केलेली चळवळ आहे. यामाध्यमातून देशातील नागरिकांना फिट राहण्यासाठी प्रोत्साहीत केलं जातं आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Fitness, Railway

    पुढील बातम्या