डोस्यापासून ते इंटरनेटपर्यंत सगळं फ्री, कर्नाटक निवडणुकीत मतदारांना मिळाले 'हे' गिफ्ट्स

डोस्यापासून ते इंटरनेटपर्यंत सगळं फ्री, कर्नाटक निवडणुकीत मतदारांना मिळाले 'हे' गिफ्ट्स

मतदारांनी मतदान करावं आणि आपला हक्क बजावावा यासाठी कर्नाटकात ऑफर्सचा पाऊस पाडण्यात आला.

  • Share this:

मुंबई, 12 मे : आज कर्नाटक विधानसभा निवडणुकांचं मतदान आहे. या मतदानादरम्यान अनेक मनोरंजक बाबी समोर आल्या. मतदारांनी मतदान करावं आणि आपला हक्क बजावावा यासाठी कर्नाटकात ऑफर्सचा पाऊस पाडण्यात आला.

प्रत्येकाने मतदान करावं यासाठी रेस्टॉरंटच्या मंडळींना फ्री डोसा खायला घातला तर बेंगळुरूच्या मतदारांसाठी इंडियन ऑयलकडून पेट्रोल-डिझेलवर 1 रुपयाची सुट देण्यात आली आहे.

सिलिकॉन व्हॅली, बंगळुरू येथील सायबर कॅफे आणि रेस्टॉरंट्समध्ये आज सगळ्या मतदारांना सवलती देण्यात आल्या आहेत. 'मतदान करा आणि फुकट जेवा' अशा पाट्याच काही हॉटेलांमध्ये लावण्यात आल्या आहेत.

काहींनी मतदान करुन येणाऱ्यांच्या बोटावरची शाही बघुन प्रत्येकाला मोफत कॉफी पाजली. त्यामुळे फुकट खाण्यासाठी का होईना अनेकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची ही अनोखी आयडीया कर्नाटक युवकांची आहे.

बरं मंडळी, फक्त हॉटेलांमध्येच नाही तर सायबर कॅफेमध्येदेखील इंटरनेटवर ऑफर देण्यात आल्या आहेत. या ऑफरमुळे अनेक तरुणांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे. काही ठिकाणी 'मोफत फोटो काढा पण मतदान करा' अशा सवलती काही फोटो स्टुडिओंकडून देण्यात आल्या.

पण या अनोख्या प्रकल्पामागे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा उपक्रम कोणत्याही पक्षाकडून राबवण्यात आला नाही. 'आम्ही कोणत्याही पार्टीचे नाही,' पण तरूणांनी मतदान करावं यासाठी आम्ही हा उपक्रम राबवत असल्याचं आयोजकांकडून सांगण्यात आलं आहे.

पण अशी लालच दाखवून आपल्या शहराच्या विकासासाठी मतदान करा असं शिक्षित तरुणांना सांगण्याची वेळ यावी हे गंभीर आहे. त्यातल्या त्यात तरुण मतदारांची संख्याही कुठेतरी कमी होताना दिसते, त्यामुळे लोकांना राजकारण किती नकोस झालं आहे, याचा अंदाज आपण लावू शकतोच.

First published: May 12, 2018, 5:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading