मसूद अझहरला दणका, फ्रान्समधील संपत्ती होणार जप्त

मसूद अझहरला दणका, फ्रान्समधील संपत्ती होणार जप्त

जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरला फ्रान्सचा दणका

  • Share this:

पॅरिस, 15 मार्च : जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अझहरला फ्रान्सने दणका दिला आहे. त्याची फ्रान्समधील जप्त करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मात्र, चीनने नकाराधिकाराचा वापर करून त्याला एकप्रकारे वाचवलं आहे. भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये मसूद अझहरचा हात आहे.गेल्या महिन्यात झालेल्या पुलवामा हल्ल्याची जबाबदारी जैश ए मोहम्मदने घेतली होती. याधी देशाच्या संसदेवर झालेला हल्लाही मसूद अझहरच्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 15, 2019 01:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...