शेतकऱ्याने आत्महत्येपूर्वी फेसबुकर टाकला व्हिडिओ, मुख्यमंत्र्यांना ठरवलं जबाबदार

शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांच्या कर्जमाफीसाठी वेगवेगळ्या घोषणा केल्या जातात. पण सत्तेत आल्यानंतर मात्र राजकीय नेत्यांना शेतकऱ्यांचा विसर पडतो. यामुळे आलेल्या नैराश्यामुळे एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आणि आपल्या आत्महत्येला मुख्यमंत्री जबाबादार आहेत,असं लिहून ठेवलं.

News18 Lokmat | Updated On: Jun 25, 2019 04:47 PM IST

शेतकऱ्याने आत्महत्येपूर्वी फेसबुकर टाकला व्हिडिओ, मुख्यमंत्र्यांना ठरवलं जबाबदार

जयपूर, 25 जून : शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांच्या कर्जमाफीसाठी वेगवेगळ्या घोषणा केल्या जातात. पण सत्तेत आल्यानंतर मात्र राजकीय नेत्यांना शेतकऱ्यांचा विसर पडतो. राजसथानमध्ये काँग्रेसचं सरकार बनल्यानंतर लगेचच मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली होती. पण राजस्थानमधले शेतकरी समाधानी नाहीत.

राजस्थानमधल्या श्रीगंगानगरमधल्या शेतकऱ्याने या सरकारची पोलखोल केली आहे. इथल्या ठकरी गावात राहणारे शेतकरी सोहनलाल यांनी आत्महत्या केली. त्याआधी या शेतकऱ्याने आपला व्हिडिओ रेकॉर्ड करून फेसबुकवर टाकला होता. या व्हिडिओमुळे त्याच्या शेजाऱ्यांना कळलं. त्याचे प्राण वाचवायला सगळेजण त्याच्या घरी धावले पण त्याआधी या शेतकऱ्याने विष घेतलं होतं.

या शेतकऱ्याने आपल्या मृत्यूला मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना जबाबदार ठरवलं आहे. आपल्या सुसाइड नोटमध्ये त्याने राजस्थान सरकारवर वचन पूर्ण न केल्याचा आरोप केला आहे.

Loading...

ही सुसाइड नोट या शेतकऱ्यानेच लिहिली आहे का याचा तपास पोलीस करत आहेत. पण शेतकऱ्याचा हा व्हिडिओ आणि सुसाइड नोटमुळे राजस्थानमध्ये खळबळ माजली आहे.

खुशखबर! पुढच्या महिन्यात स्वस्त होऊ शकतं स्वयंपाक करणं आणि कार चालवणं

या व्हिडिओमध्ये शेतकरी म्हणतो, मी स्वत:ला मारून घेतो आहे. पण शेतकऱ्यांच्या समस्या सरकारने जाणून घ्यावा आणि कर्जमाफी द्यावी. मी काही चुकीचं केलं असेन तर मी माझ्या कुटुंबाची माफी मागतो. माझ्या मृत्यूनंतर माझ्या गावात शेतकऱ्यांची एकी होईल, अशी मला आशा आहे.

शेतकऱ्याच्या आत्महत्येवर उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. ज्या शेतकऱ्याने आत्महत्या केली त्याच्यावर कर्ज नव्हतं, अशी माहिती आहे, असं त्यांनी सांगितलं.

============================================================================================

VIDEO: पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे वाचला महिलेचा जीव

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 25, 2019 04:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...