धक्कादायक! चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार

धक्कादायक! चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार

Rape In Jabalpur : जबलपूरमध्ये चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

  • Share this:

भोपाळ, 10 जून : मध्य प्रदेशमध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहे. अलिगड आणि उज्जैनमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना समोर आल्यानंतर आता जबलपूरमध्ये देखील धक्कादायक घटना घडली आहे. जबलपूरमध्ये चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे. रविवारी घडलेल्या या घटनेनंतर नराधमाला अटक देखील करण्यात आलं आहे. आरोपी अल्पवयीन असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीला रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून यावेळी आणखी कोण होतं का? याचा शोध घेतला जात आहे.

उज्जैनमध्ये देखील बलात्कार

7 जून रोजी उज्जैनमध्ये देखील 5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. यावेळी मुलीवर बलात्कार करण्यात आल्याचं मेडिकल रिपोर्टमधून स्पष्ट झालं होतं. या प्रकरणात 3 लोकांना अटक करण्यात आली. यामध्ये मुलीच्या एका नातेवाईकाचा देखील समावेश आहे. 7 जूनला मुलगी हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर शोध घेतला असता नदीमध्ये मृतदेह आढळून आला होता.

VIDEO : मुंबईच्या रस्त्यावर स्टंट करत मद्यपींचा धुमाकूळ

First published: June 10, 2019, 10:41 AM IST
Tags: Rape

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading