शहीद वडिलांच्या अंत्यसंस्काराला चिमुकला गाऊ लागला 'गोल-गोल रानी..', अश्रू अनावर

शहीद वडिलांच्या अंत्यसंस्काराला चिमुकला गाऊ लागला 'गोल-गोल रानी..', अश्रू अनावर

शहीद वडिलांच्या अंत्यस्कारावेळी त्यांच्या 4 वर्षाच्या मुलाने 'गोल-गोल रानी, इत्ता--इत्ता पानी..' हे गाणं म्हणण्यास सुरुवात केली आणि सगळ्यांच्या हृद्याला पाझर फुटला.

  • Share this:

जगदलपूर, 16 मार्च : 'गोल-गोल रानी, इत्ता--इत्ता पानी..' सारखी बालगीतं म्हणण्यामध्ये आपल्या सगळ्यांचं बालपण गेलं. आतासुद्धा ही गाणी मनाला आनंद देतात. बालपणातील आठवणींमध्ये कुठेतरी घेऊन जातात. पण रविवारी एका चिमुकल्याच्या मुखातून हे गाणं ऐकताच तिथे उपस्थित शेकडो लोकांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. छत्तीसगड सशस्त्र सैन्याने (CAF) शिपाई उपेंद्र साहू यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी मनाला स्पर्श करणारी ही घटना घडली. शहीद वडिलांच्या अंत्यस्कारावेळी त्यांच्या 4 वर्षाच्या मुलाने 'गोल-गोल रानी, इत्ता--इत्ता पानी..' हे गाणं म्हणण्यास सुरुवात केली आणि सगळ्यांच्या हृद्याला पाझर फुटला.

गार्ड ऑफ ऑनर प्रदान

शनिवारी बस्तर इथे नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात छत्तीसगड सशस्त्र दलाचे दोन जवान शहीद झाले. त्यातील एका उपेंद्र साहू यांच्यावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीदचा मृतदेह नदीच्या काठी घराबाहेर आणला गेला. शहीद उपेंद्र यांचा चार वर्षांचा मुलगा लकीही तिथे उपस्थित होता. त्याचवेळी लकीचा मोठा भाऊ अनिरुद्ध वडिलांना मुखाग्नी देण्याची तयारी करीत होता. शहीद जवानांचा नश्वर मृतदेह इंद्रावतीच्या नवीन पुलाखालून नदीच्या काठावर आणला. यानंतर हुतात्म्याच्या पार्थिवाचे पुष्पहार अर्पण करून पुन्हा एकदा गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.

याच वेळी, शहीद उपेंद्र यांचा मुलगा लकीला असं वाटलं की एक खेळ चालू आहे. नातेवाईकाच्या मांडीवर बसला असताना त्याने त्याच्या शाळेतलं बाल गीत म्हणण्यास सुरुवात केली. 'गोल-गोल रानी, इत्ता--इत्ता पानी..' लहान मुलाचा हा निरागसपणा पाहून सगळ्यांच्या डोळ्यांत पाणी आलं. लकीला समोर सुरू असलेल्या घटनेबद्दल काहीही समज नव्हती. त्यामुळे त्याच्या गाण्यामुळे सगळ्यांनाच रडू कोसळलं.

नातेवाईकाला विचारलं, पप्पाला कुठे लागलं आहे?

गाण्याच्या दोन ओळी गायल्यानंतर मुलानं आपल्या एका नातेवाईकाला विचारलं की पप्पांना कुठे लागलं आहे. आणि असं विचारताना त्याने शहीद वडिलांच्या चेहऱ्यावर हात फिरवला. हा क्षण पाहिल्यानंतर सगळ्यांचं मन सुन्न झालं. आपल्या वडिलांसोबत काय झालं हेसुद्धा या लेकराला माहित नव्हतं.

First published: March 16, 2020, 10:37 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading