Home /News /national /

भारतीय लष्कराला मोठं यश, हिजबुल मुजाहिद्दीनच्या 4 दहशतवाद्यांचा केला खात्मा

भारतीय लष्कराला मोठं यश, हिजबुल मुजाहिद्दीनच्या 4 दहशतवाद्यांचा केला खात्मा

आजच्या कारवाईसह आतापर्यंत हिजबुल मुजहिद्दीनच्या 9 दहशतवाद्यांनी गेल्या 24 तासांत ठार करण्यात भारतीय लष्कराला यश आलं आहे.

    शोपियान, 08 जून : जम्मू-काश्मीरच्या (Jammu-Kashmir) शोपियान जिल्ह्यात आज पहाटे लष्कराच्या आणि सीएपीएफ तुकड्यांसह सुरू झालेल्या पोलीस कारवाईत चारही दहशतवादी ठार झाले. ते हिजबुल मुजाहिद्दीन संबंधित आहेत. सुरक्षा दलानं संपूर्ण परिसर बंद करण्यात आला असून सर्च ऑपरेशन सुरू आहे. आजच्या कारवाईसह आतापर्यंत हिजबुल मुजहिद्दीनच्या 9 दहशतवाद्यांनी गेल्या 24 तासांत ठार करण्यात भारतीय लष्कराला यश आलं आहे. शोपियान जिल्ह्यातील पिंजुरा गावात दहशतवादी आणि सुरक्षा दलांच्या दरम्यान एनकाउंटर सुरू झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय सुरक्षा दलांना शोपियांच्या पिंजोरा भागात काही दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. माहितीच्या आधारे स्थानिक पोलिसांसह भारतीय सुरक्षा दलांनी पिंजोरा परिसराला घेराव घातला. स्वत: ला वेढलेले पाहून दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. बर्‍याच दिवस गोळीबारानंतर 4 दहशतवादी ठार झाले आहेत. मुख्य म्हणजे, रविवारी दक्षिण काश्मीरमधील शोपियानच्या रीबन भागात पाच अतिरेकी लपल्याची माहिती मिळाली. माहितीच्या आधारे भारतीय सुरक्षा दलाने स्थानिक पोलिसांसह संयुक्त पथक तयार केले आणि त्या भागाला वेढा घातला. भारतीय जवानांनी घेतलेल्या सर्च ऑपरेशनची खबर मिळताच या भागात लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला, त्यानंतर चकमकीला सुरुवात झाली. मात्र, बराच गोळीबारानंतर दोन कमांडरांसह पाच अतिरेकी ठार झाले. ऑपरेशन दरम्यान कोणतेही नुकसान झाले नाही. यापूर्वी जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील दमल हंजीपोरा भागात सुरक्षा दल आणि अतिरेक्यांच्या चकमकीत दोन अतिरेकी ठार झाले होते. चकमकी लक्षात घेता कुलगाम आणि शोपियां जिल्ह्यात मोबाइल इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    पुढील बातम्या