TDPला मोठा धक्का, 4 खासदार भाजपमध्ये प्रवेश करणार TDP MP, BJP, Chandrababu Naidu

TDPला मोठा धक्का, 4 खासदार भाजपमध्ये प्रवेश करणार TDP MP, BJP, Chandrababu Naidu

तेलगु देशम पक्षाचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू यांना मोठा धक्का बसणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 जून: लोकसभा निवडणुकीतील अपयशाबरोबरच आंध्र प्रदेशमधील सत्ता गमवाव्या लागणाऱ्या तेलगु देशम पक्षाचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू यांना मोठा धक्का बसणार आहे. पक्षाचे 4 खासदार लवकरच भाजपमध्ये सहभागी होणार आहेत. काही दिवसापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचा मोठा पराभव झाला होता. त्यांचे केवल तीन खासदार निवडून आले होते. आता जे खासदार भाजपच्या वाटेवर आहेत ते सर्व जण राज्यसभेतील आहेत. यासंदर्भात लवकरच पत्रकार परिषद घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टीडीपी सोडून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये वाय.एस.चौधरी, सी.एस. रमेश, टी.जी.वेंकटेश आणि मोहन राव यांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीत टीडीपीला केवळ 3 जागा जिंकता आल्या होत्या. 2014च्या तुलनेत त्यांच्या जागा 12 ने कमी झाल्या होत्या. त्याच बरोबर नायडू यांची राज्यातील सत्ता देखील केली होती. वायएसआर काँग्रेसचे जगनमोहन रेड्डी यांनी लोकसभेत राज्यातील 25 पैकी 22 जागांवर विजय मिळावला होता. वायएसआरने विधानसभेत 175 पैकी 151 जागांवर विजय मिळवला होता. तर सत्ताधारी नायडू यांना केवळ 23 जागा मिळाल्या होत्या.

आता टीडीपीचे 4 खासदार पक्ष सोडणार असल्यामुळे हा त्यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

VIDEO : लग्नाला स्विफ्टने जायचे, 1000 रुपये अहेर करून सोनं लुटायचे!

First published: June 20, 2019, 5:57 PM IST

ताज्या बातम्या