सुप्रीम कोर्टाच्या 4 ज्येष्ठ न्यायमूर्तींचा 'चीफ जस्टिस'विरोधात सर्जिकल स्ट्राईक !

सुप्रीम कोर्टाच्या 4 ज्येष्ठ न्यायमूर्तींचा 'चीफ जस्टिस'विरोधात सर्जिकल स्ट्राईक !

सुप्रीम कोर्टाच्या 4 न्यायमूर्तींची पत्रकार परिषद झाली. न्यायमूर्तींची पत्रकार परिषद होण्याची ही पहिलीच घटना. रंजन गोगोई, जे. चलमेश्वर, मदन लोकूर, कुरियन जोसेफ या चार न्यायाधीशांनी मीडियाशी संवाद साधला.

  • Share this:

नवी दिल्ली, 12 जानेवारी : "सुप्रीम कोर्टाचा गेल्या दोन महिन्यातील कारभार व्यथित करणारा आहे. काही महिन्यांपासून सुप्रीम कोर्ट प्रशासन नीट काम करत नाही. याबाबत मुख्य न्यायमूर्तींसमोर प्रश्न मांडले, पण काहीच उपयोग झाला नाही", अशी हतबलता दुसऱ्या-तिसऱ्या कोणी नाही तर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी मांडली.

भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेतली. न्यायमूर्ती कुरियन जोसेफ, न्यायमूर्ती रंजन गोगोई, न्यायमूर्ती जे चेलमेश्वर आणि न्यायमूर्ती मदन लोकूर यांनी पत्रकार परिषद घेतली. विशेष म्हणजे ज्या चार न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेतली ते सरन्यायाधीशांनंतरचे सर्वात सीनियर आहेत. न्यायमूर्ती जे चेलमेश्वर यांच्या घरासमोर ही पत्रकार परिषद घेण्यात आली.

पत्रकार परिषदेत न्यायमूर्ती म्हणतात...

"देशातल्या इतिहासातला ही असाधरण घटना आहे. ही पत्रकार परिषद घेताना आम्हाला आनंद होत नाहीय...पण सुप्रीम कोर्टाच्या प्रशासनाचं कामकाज नीट होत नाहीय.. गेल्या काही महिन्यांत काही गोष्टी घडल्या त्या योग्य नव्हत्या. एक जबाबदारी म्हणून आमच्यासारख्या जेष्ठ न्यायाधीशांनी सरन्यायाधीशांना काही गोष्टी योग्य होत नसल्याचं आणि त्यावर उपायांची गरज असल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवानं आमच्या प्रयत्नांना यश आलं नाही. ही व्यवस्था टिकल्याशिवाय कोणत्याही देशातली लोकशाही व्यवस्था टिकणार नाही. सुदृढ लोकशाहीसाठी त्या देशातली न्यायव्यवस्था स्वायत्त असणं गरजेचं असतं. आम्ही चार जण सरन्यायाधीशांकडे गेलो. त्यांना विनंती केली की काही गोष्टी व्यवस्थित होत नाहीयत. त्यामुळे त्यात लक्ष घालायला हवं. पण दुर्दैवानं सर्वोच्च न्यायालयाचे चार वरिष्ठ न्यायाधीश विनंती करत असतानाही त्याकडे लक्ष देण्यात आलं नाही. त्यामुळे आम्हाला देशासमोर यावं लागलं. 20 वर्षांनंतर असं कुणी म्हणायला नको की आमच्यासारख्या ज्येष्ठ न्यायाधीशांनी आपला आत्मा विकला होता. त्यामुळेच आम्ही हे सर्व देशातल्या लोकांसमोर माडलं."

काय म्हणाले न्यायाधीश?

'न्यायव्यवस्था टिकली तरच लोकशाही टिकेल'

'सुप्रीम कोर्ट प्रशासन योग्य रीतीनं काम करत नाही'

'मुख्य न्यायमूर्तींपुढे प्रश्न मांडले, पण उपयोग नाही'

'गेल्या 2 महिन्यांतील कारभारामुळे आम्ही व्यथित'

'लोकशाहीत न्यायपालिकेला स्वातंत्र्य आवश्यक'

'मजबूत लोकशाहीसाठी न्यायपालिकेची स्वायत्ता महत्वाची'

'मुख्य न्यायमूर्तींना दिलेलं पत्र सार्वजनिक करणार'

या न्यायमूर्तींनी घेतली पत्रकार परिषद

न्यायमूर्ती जे. चेलमेश्वर

न्यायमूर्ती रंजन गोगोई

न्यायमूर्ती मदन लोकूर

न्यायमूर्ती कुरियन जोसेफ

 

 

 

 

 

First published: January 12, 2018, 12:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading