पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याला बांगलादेशात का होतोय विरोध? आंदोलनादरम्यान चौघांचा मृत्यू

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याला बांगलादेशात का होतोय विरोध? आंदोलनादरम्यान चौघांचा मृत्यू

पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेशच्या 50व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त बांगलादेश दौऱ्यावर (PM Modi in Bangladesh) आहेत. यालाच विरोध करणाऱ्या आंदोलनात चौघांचा मृत्यू झाला आहे.

  • Share this:

ढाका 27 मार्च : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांगलादेश (PM Modi in Bangladesh) दौऱ्याविरोधात शुक्रवार प्रदर्शन करण्यात आलं. या हिंसक आंदोलनात चार जणांचा मृत्यू झाला. तर, अनेकजण जखमी झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) बांगलादेशच्या 50व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त बांगलादेश दौऱ्यावर आहेत. याच विरोधत आंदोलन करणाऱ्या चटगाव जिल्ह्यातील एक प्रसिद्ध मदरसामधील विद्यार्थी आणि मुस्लीम समूहाच्या सदस्यांची पोलिसांसोबत झडप झाली, यात चौघांचा मृत्यू झाला.

चटगाव मेडिकल कॉलेज रुग्णालयात एक पोलीस अधिकारी अलाउद्दीन तालुकदारनं सांगितलं, की पाच लोकांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, यातील चौघांचा मृत्यू झाला. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, हिफाजत -ए-इस्लाम या समूहाच्या काही सदस्यांनी चटगावच्या हथाजारी परिसरातील पोलीस ठाणे आणि सरकारी कार्यालयांवर हल्ला केला. यानंतर पोलिसांना कारवाई करावी लागली.

अधिकाऱ्यांनी सांगितलं, की ढाकाच्या मुख्य मस्जिदपाशी प्रदर्शनकर्त्यांच्या गटांमध्ये झडप झाली. यानंतर पोलिसांनी अश्रूधुराचा आणि रबराच्या गोळ्यांचा वापर करत गर्दी कमी करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान अनेकजण जखमी झाले. प्रदर्शनकर्त्यांनी ब्राह्मणबरिया जिल्ह्यातील रेल्वे स्टेशनच्या ऑफिसमध्ये आग लावली. यामुळे रेल्वेसेवाही विस्कळीत झाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या निमंत्रणामुळे ढाका दौऱ्यावर गेले आहेत. मागील काही दिवसांपासून मुस्लीम नेते आणि डाव्या संघटना या दौऱ्याच्या विरोधात रॅली काढत आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे, की शेख़ मुजीबुर रहमान यांनी एका धर्मनिरपेक्ष राष्ट्रासाठी संघर्ष केला मात्र मोदी सांप्रदायिक आहेत.

Published by: Kiran Pharate
First published: March 27, 2021, 10:39 AM IST

ताज्या बातम्या