दुबईमध्ये नोकरी देण्याच्या नावाखाली 4 महिलांना बनवलं ‘बार डान्सर’

दुबईमध्ये नोकरी देण्याच्या नावाखाली 4 महिलांना बनवलं ‘बार डान्सर’

Dubaiमध्ये नोकरी देण्याच्या नावाखाली 4 भारतीय महिलांची फसवणूक झाली आहे.

  • Share this:

दुबई, 30 जून : परदेशात नोकरी देण्याच्या नावाखाली अनेकांची फसवणूक झालेली आहे. काही लोकांना मोठ्या प्रमाणावर त्रास देखील झालेला असल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. दरम्यान, पुन्हा एकदा दुबईमध्ये नोकरी देण्याच्या नावाखाली 4 भारतीय महिलांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. या महिलांना एका इव्हेंट कंपनीमध्ये काम करण्याचं आमिष दाखवलं गेलं. त्यानंतर मात्र दुबईमध्ये गेल्यानंतर त्यांच्यावर जबरदस्ती करत त्यांना बार डान्सर म्हणून काम करण्यास भाग पाडलं. पण, भारतीय दुतावासानं यामध्ये लक्ष घातल्यानंतर महिलांची सुटका करण्यात आली आहे. महिलांची सुटका करण्यामध्ये दुबई पोलिसांनी केलेली मदत हो मोलाची ठरली. शिवाय महिलांना दाखवलेल्या खंबीरपणामुळे देखील त्यांना भारतात येणं शक्य झालं आहे. चारही महिलांना भारतात पाठवलं जाणार आहे.

काय आहे प्रकरण?

तामिळनाडूतील कोईंबतूर येथील चार महिलांना दुबईमध्ये एका इव्हेंट कंपनीमध्ये काम करण्याचं आश्वासन दिलं गेलं. पण, दुबईमध्ये गेल्यानंतर त्यांच्यावर बारमध्ये काम करण्यास जबरदस्ती करण्यात येऊ लागली. त्यांना जबरदस्ती एका खोलीत डांबून ठेवण्यात आलं. यावेळी प्रसंगावधान राखत एका महिलेनं व्हॉटसअॅपवरून आपल्या कुटुंबियांना याबद्दलची माहिती दिली. अखेर भारतीय दुतावासानं या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेत दुबई पोलिसांना याची माहिती दिली. दुबई पोलिसांनी त्यानंतर या महिलांची सुटका केली आहे. या चारही महिलांना विमानानं कोडिकोडे येथे पाठवलं जाणार आहे. तर, भारतीय दूतावास महिलांना दुबईला पाठवणाऱ्या एजंटविरोधात कारवाई करण्यासाठी तामिळनाडू सरकरला पत्र लिहिणार आहे. या पत्रामध्ये एजंटविरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात येणार आहे.

VIDEO: भिवंडीत पावसाचा जोर कायम; 100 हून अधिक दुकानात शिरलं पाणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 30, 2019 09:29 AM IST

ताज्या बातम्या