विदर्भ सिंचन घोटाळ्यात एसीबीकडून नागपुरात 4 एफआयआर दाखल

विदर्भ सिंचन घोटाळ्यात एसीबीकडून नागपुरात 4 एफआयआर दाखल

आघाडी सरकारच्या काळातील सिंचन घोटाळ्याप्रकरणी आज नागपुरात आणखी 4 एफआयआर दाखल झालेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हे एफआयआर दाखल केलेत. विशेषतः विदर्भातल्या गोसीखुर्द घोटाळ्याप्रकरणी हे नवीन एफआयआर दाखल करण्यात आलेत.

  • Share this:

12 डिसेंबर, नागपूर : आघाडी सरकारच्या काळातील सिंचन घोटाळ्याप्रकरणी आज नागपुरात आणखी 4 एफआयआर दाखल झालेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हे एफआयआर दाखल केलेत. विशेषतः विदर्भातल्या गोसीखुर्द घोटाळ्याप्रकरणी हे नवीन एफआयआर दाखल करण्यात आलेत. या नवीन एफआयआरमध्ये संबंधीत कंत्राटदारांसोबत माजी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांचंही नाव समाविष्ट करण्यात आल्याचं बोललं जातंय. त्यामुळे राष्ट्रवादीचे पदेशाध्यक्ष सुनील तटकरे पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झालीय. पण नवीन एफआयआरमध्ये तटकरेंचं नाव आहे की नाही याबाबत अजून दुजोरा मिळू शकलेला नाही.

प्रकल्प कंत्राटदार रामी रेड्डी आणि जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांची नावं एसीबीच्या एफआयआरमध्ये दाखल करण्यात आल्याचं सांगितलं जातंय. रामी रेड्डी यांचे राजकीय नेत्यांशी काही लागेबांधे आहेत का ? हे देखील तपासलं जाणार आहे.

विशेष म्हणजे आजच राष्ट्रवादीने नागपूर अधिवेशनात हल्लाबोल मोर्चा काढून भाजप सरकारविरोधात जोरदार रान पेटवण्याचा प्रयत्न चालवलाय. अशातच एसीबीकडून सिंचन घोटाळ्यात आणखी चार एफआयर दाखल होणं हा नक्कीच योगायोग नसल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. रायगडमधील बाळगंगा धरण घोटाळ्यातही यापूर्वीच सुनील तटकरेंची सुरू आहे. तसंच अजित पवारांचं नावही वारंवार सिंचन घोटाळ्याशी जोडलं जातंय. त्यामुळे सिंचन घोटाळ्यात राष्ट्रवादीच्या दोन माजी मंत्र्यांवरील कारवाईची टांगती तलवार अजूनही कायम असल्याचं बोललं जातंय.

काय आहे सिंचन घोटाळा ? (header)

60 हजार कोटींचा घोटाळ्याचे आरोप

250 पेक्षा जास्त कंत्राटांची चौकशी सुरू

अडीच वर्षांपासून चौकशी सुरू

आत्तापर्यंत आठ एफआयआर दाखल

सदर पोलीस ठाण्यात एकाच दिवशी चार एफआयआर

या चार प्रकल्पांच्या भ्रष्टाचारप्रकरणी एफआयआर

1) मोखाबर्डी उपसा सिंचन कालव्याचे बांधकाम

2) गोदीखुर्द डावा कालव्याच्या 10 किमीचे बांधकाम

3) मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेच्या वडाला शाखा कालव्याचे बांधकाम

4) गोसीखुर्द उजव्या कालव्याच्या घोडाझरी कालव्याचे बांधकाम

कोण कोण आहेत गुन्हा दाखल झालेले अधिकारी ते ग्राफिक्सच्या माध्यमातून....

उमाशंकर पर्वते, कार्यकारी अभियंता

सी. टी. जिभकाटे, विभागीय लेखा अधिकारी

डी. डी. पोहेकर, अधीक्षक अभियंता, गोसीखुर्द

सो. रा. सूर्यवंशी, मुख्य अभियंता

डी. पी. शिर्के, कार्यकारी संचालक

ललित इंगळे, कार्यकारी अभियंता

गुरुदास मांडवकर, विभागीय लेखाधिकारी

संजय खोलापूरकर, अधीक्षक अभियंता

First published: December 12, 2017, 6:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading