श्रीनगर, 13 जून : नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत बेछुट गोळीबार सुरु केला आहे. या गोळीबारात भारताच्या चार जवानांना वीरमरण आलं आहे. तर तीन जवान जखमी झाले आहेत. एक सहायक कमांडंट, एक उपनिरीक्षक आणि सीमा सुरक्षा दल (बीएसएफ)च्या दोन सैनिकांनी यात आपला प्राण गमवावा लागला आहे.
सांबा विभागातील चांबियाल येथे पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत रात्रीपासून तुफान गोळीबार सुरू केला आहे. दरम्यान, रमजानच्या महिन्यात जम्मू काश्मीरमध्ये कोणत्याही प्रकारचे तेढ आणि गोळीबार करू नका असं आदेश केंद्र सरकारने दिले होते. पण पाकिस्तानकडून वारंवरार या नियमांचं उल्लंघण केलं जातं.
काल देखील पुलवामामध्ये पोलिस पथकावर पाककडू गोळीबार करण्यात आला होता. या हल्ल्यात 2 पोलीस शहीद झाले होते तर 3 जखमी झाले होते.