लखनऊ 01 जून: उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) अयोध्यामध्ये (Ayodhya) राम मंदिराच्या (Ram Mandir) निर्माणाचं काम वेगानं सुरू आहे. या मंदिराच्या पायाभरणीसाठी जमिनीपासून 40 फूट खोल काँक्रीटचे परत लावण्याचे काम सुरू आहे. असे 45 परत लावल्यानंतर यावर भव्य राम मंदिराच्या गर्भगृह-मंडपाचे बांधकाम सुरू होईल. राम मंदिराचा विस्तार आता 70 एकरवरुन 107 एकरपर्यंत वाढविण्यात आला आहे. यासाठी राम जन्मभूमी परिसरात 7,285 वर्ग फूट जमीन खरेदी केली आहे.
Petrol Price: सामान्यांना झटका! एका महिन्यात पेट्रोलच्या दराने गाठला उच्चांक
राम मंदिराच्या कामासाठी राम जन्मभूमीवर जमिनीपासून 40 फूटांपर्यंत खोल खोदकाम केले गेले आहे. या उत्खननानंतर बाहेर आलेले सर्व पुतळे आणि मंदिरांचे अवशेष जतन केले गेले आहेत. राम मंदिराचा पाया मजबूत करण्यासाठी जमिनीत 40 फूट उत्खनन करण्यात आले आहे. या विशाल जागेत आता काँक्रिटचे परत लावण्याचे काम सुरू आहे.
शेतकऱ्याच्या शेतात सापडली 47 पोती, सव्वा कोटीचा माल पाहून पोलीसही झाले हैराण
आतापर्यंत एकावर एक असे चार परत बसवण्यात आले आहेत. या थरांची लांबी 400 फूट तर रुंदी 300 फूट आहे. एक थर जवळपास 12 इंचाचा असतो, हा थर टाकल्यानंतर रोलरनं तो दाबला जातो. जेव्हा ही लेयर दाबल्यानंतर २ इंच कमी होऊन 10 इंच होते तेव्हा दुसरा थर टाकला जातो. अशाच 40-45 लेअर टाकल्या जाणार आहेत. यानंतर साडे 16 फूट उंच व्यासपीठाचं काम सुरू होईल. यावर भव्य राम मंदिराच्या मुख्य गर्भगृह आणि मंडपाचं काम सुरू होईल. राम मंदिराच्या निर्मितीसाठी 36 महिने लागतील, असं म्हटलं जात आहे. असं झाल्यास डिसेंबर 2023 ते मार्च 2024 या काळात भव्य राम मंदिर अयोध्येत उभा राहिल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.