740 कोटींचा घोटाळा, Ranbaxy च्या माजी प्रमोटरला अटक

740 कोटींचा घोटाळा, Ranbaxy च्या माजी प्रमोटरला अटक

या भावांनी भामटेगीरी करत फोर्टिसच्या खात्यातून हा फंड दुसरीकडे वळवला आणि पैशांच्या व्यवहारातही गैरव्यवहार केला त्यामुळे ही कारवाई करण्यात आलीय.

  • Share this:

नवी दिल्ली 10 ऑक्टोंबर : औषध निर्माण क्षेत्रातली नामांकित कंपनी असलेल्या Ranbaxy चे माजी प्रमोटर शिविंदर सिंह (Shivinder Singh) आणि रेलिगेयरचे माजी CMD​सुनील गोधवानी (Sunil Godhwani) यांना आज दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं (Economic Offence Wing, Delhi) अटक केलीय. या कारवाईने उद्योग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 740 कोटींच्या घोटाळा प्रकरणी या दोघांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. तर अन्य एक आरोपी मलविंदर सिंह यांच्याविरुद्ध पोलिसांनी लुक आऊट नोटीस बजावलीय.

डिसेंबर 2018मध्ये Religare Finvest Limited ने दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे यासंबंधात तक्रार दाखल केली होती. त्यासंदर्भात आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. चौकशी झाल्यानंतर त्या दोघांनाही पोलिसांनी जेरबंद केलं. सिंगापुर ट्रिब्युनलनेही यांना दोषी ठरवलं होतं.

मुख्यमंत्र्यांनी नागपूरला बनवलं 'क्राईम सिटी', शरद पवारांचा पलटवार

शिविंदर सिंह आणि मलविंदर सिंह या दोन भावांवर ​दाइची सांक्यो या कंपनीचं 3 हजार 500 कोटींचं कर्ज आहे. ते परत नकेल्याने या कंपनीने सिंगापूर ट्रिब्युनलकडे तक्रार दाखल केली होती. या दोन भावांचा Ranbaxy ला जपानच्या औषध निर्माण कंपनीला विकाण्याचा डाव होता असाही त्यांच्यावर आरोप आहे. सेबीनेही यांना 403 कोटी जमा करण्याचा आदेश दिला होता.

अमित शहांनी 370 वरून पवारांना पुन्हा घेरलं; म्हणाले, मतदारच जाब विचारतील

फोर्टिस हेल्थेकयर आणि रेलिगेयर एंटरप्राइज लिमिटेड या कंपन्यांच्या संदर्भात या दोन भावांमध्ये भांडण सुरू होतं. त्यामुळे सेबीने या दोन कंपन्यांसह त्यांच्याशी संबंधीत 8 फर्म्सला 403 कोटी  फोर्टिसच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश दिले होते. या भावांनी भामटेगीरी करत फोर्टिसच्या खात्यातून हा फंड दुसरीकडे वळवला आणि पैशांच्या व्यवहारातही गैरव्यवहार केला त्यामुळे ही कारवाई करण्यात आलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 10, 2019 07:20 PM IST

ताज्या बातम्या