नवी दिल्ली, 27 सप्टेंबर : माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेता जसवंत सिंह यांंचं निधन झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. 2014 पासूनच ते कोमामध्ये असल्याचे सांगितले जात आहे. जसवंत सिंह यांनी वाजपेयी सरकारमध्ये अनेक मंत्रालयात महत्त्वपूर्ण पदांवर काम केलं आहे.
जसवंत सिंहाचा जन्म 3 जानेवारी 1938 मध्ये राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यातील जसोल गावात झाला होता. त्यांचा मोठा मुलगा मानवेंद्र सिंह बाडमेरमध्ये माजी खासदार राहिले आहेत. जसवंत सिंहाच्या राजकारणातील कामगिरीबद्दल सांगायचे झाल्यास 60 च्या दशकात ते राजकारणात आले. भाजपचे मोठे नेता आणि माजी उपराष्ट्रपती भैरव सिंह शेखावत यांना जसवंत सिंहाचा गुरु मानले जाते. ते 16 मे 1996 ते 1 जून 1996 पर्यंत देशाचे अर्थमंत्री राहिले. यावेळी अटल बिहारी वाजपेयी अवघ्या 13 दिवसांसाठी देशाचे पंतप्रधान झाले होते. दोन वर्षांनंतर जेव्हा वाजपेयी पुन्हा देशाचे पंतप्रधान झाले तेव्हा त्यांच्यावर परराष्ट्र मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यानंतर 2002 मध्ये त्यांना अर्थमंत्रीपद देण्यात आले.
जिन्नाचं कौतुक केलं म्हणून पार्टीतून काढलं
आपलं पुस्तक जिन्नाह-इंडिया पार्टिशन इंडिपेन्डेन्समझ् पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांचं कौतुक केल्यामुळे भाजपने त्यांना 19 ऑगस्ट 2009 मध्ये पार्टीतून बेदखल केलं होतं. त्यानंतर जसवंत सिंह 2004 ते 2009 मध्ये संसदेत राज्यसभेत विपक्ष नेता म्हणून राहिले. त्यानंतर त्यांना पुन्हा पार्टीत घेण्यात आलं. 2012 मध्ये उपराष्ट्रपतिपदासाठी झालेल्या निवडणुकीत जसवंत राजग उमेदवार होते. तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि एआयएडीएमकेचे प्रमुख जयललिता यांनी जसवंत सिंह यांना समर्थनाची घोषणी केली होती.
Spoke to Shri Manvendra Singh and expressed condolences on the unfortunate demise of Shri Jaswant Singh Ji.
True to his nature, Jaswant Ji fought his illness with immense courage for the last six years.
— Narendra Modi (@narendramodi) September 27, 2020
Jaswant Singh Ji will be remembered for his unique perspective on matters of politics and society. He also contributed to the strengthening of the BJP. I will always remember our interactions. Condolences to his family and supporters. Om Shanti.
— Narendra Modi (@narendramodi) September 27, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जसवंत सिंह यांच्या मृत्यूनंतर दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी सोशल मीडियावर ट्विट करीत आपल्या भावना व्यक्त केल्या.