Home /News /national /

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते ऑस्कर फर्नांडिस यांचं निधन

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते ऑस्कर फर्नांडिस यांचं निधन

80 वर्षांचे ऑस्कर फर्नांडिस बऱ्याच काळापासून आजारी होते. आणि काही आठवड्यांपूर्वी त्यांना मंगळुरू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

    बंगळुरू, 13 सप्टेंबर : माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेता ऑस्कर फर्नांडिस (Congress leader Oscar Fernandes passed away ) यांचं निधन झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. कर्नाटकमधील (Karnatak News) मंगळुरूमध्ये ऑस्कर फर्नांडिस यांनी शेवटचा श्वास घेतला. रुग्णालयाकडून या वृत्ताची पुष्टी करण्यात आली आहे. 80 वर्षांचे ऑस्कर फर्नांडिस बऱ्याच काळापासून आजारी होते. आणि काही आठवड्यांपूर्वी त्यांना मंगळुरू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या वर्षीय योग करीत असताना त्यांना जखमही झाली होती. यानंतर त्यांनी तब्येत अधिक बिघडली. (Former Union Minister and senior Congress leader Oscar Fernandes passed away) गांधी कुटुंबीयांच्या जवळचे होते ऑस्कर फर्नांडिस ऑस्कर फर्नांडिस काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयं होतं. ते यूपीए सरकारमध्ये रस्ते परिवहन मंत्री राहिले होते. आता देखील ते राज्यसभामध्ये खासदार होते. हे ही वाचा-गुजरातमध्ये अहमद पटेल यांची कमी भरून काढण्यात बघेल, पायलट यशस्वी होणार का? 1980 मध्ये कर्नाटकातील उडप्पी लोकसभा जागेवरुन ते खासदार म्हणून निवडून आले होते. यानंतर 1996 पर्यंत ते सातत्याने निवडून आले होते. 1998 मध्ये काँग्रेसने त्यांना राज्यसभेत पाठवलं होतं. तेव्हापासून ते राज्यसभा खासदार असताना संसदेचे सदस्य म्हणून राहिले होते.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Congress

    पुढील बातम्या