अखेर देशाला मिळाले पहिले लोकपाल, उद्या होणार घोषणा

अखेर देशाला मिळाले पहिले लोकपाल, उद्या होणार घोषणा

देशाचे पहिले लोकपाल होणार सर्वोच्च न्यायालयाचे हे माजी न्यायाधीश

  • Share this:

नवी दिल्ली, 17 मार्च : सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश पिनाकी चंद्र घोष यांचे नाव देशाचे पहिले लोकपाल म्हणून निश्चित करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी याबाबत अधिकृत घोषणा करण्यात येईल. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश असलेले घोष सध्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य आहेत.

भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर एक स्वतंत्र संस्था स्थापन करण्यासाठी 2013 मध्ये लोकपाल आणि लोकायुक्त विधेयक मंजूर करण्यात आले होते. 16 जानेवारी 2016 ला हे विधेयक लागू करण्यात आले होते. मात्र, केंद्रातील मोदी सरकार पाच वर्षांच्या कार्यकाळात लोकपाल नियुक्त करू शकले नाही.

लोकपाल नियुक्ती करण्यासाठी उशिर होत असल्याबद्दल कॉमन कॉज या स्वयंसेवी संस्थेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होता. याचिकाकर्त्याकडून वरिष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी लवकरात लवकर सरकारने लोकपाल नियुक्ती करावी अशी मागणी केली होती. याबाबत सरकारने आदेश द्यावेत असंही त्यांनी म्हटलं होतं.

याचिकेवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी खंडपीठाने मोदी सरकारला लोकपाल नियुक्तीत होत असलेल्या दिरंगाईचे कारण विचारले होते. याचे उत्तर देण्यासाठी 15 दिवसांचा अवधीही देण्यात आला होता.

याआधी 17 जानेवारीला झालेल्या सुनावणीवेळी लोकपाल नियुक्तीवरुन सरकारला सुनावले होते. काँग्रेसचे जेष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनीही दोन दिवसांपूर्वी लोकपाल नियुक्तीबाबत सरकारला सातव्यांदा पत्र लिहले होते.

SPECIAL REPORT: पवारांच्या खेळीने आमदार कर्डिले धर्मसंकटात?

First published: March 17, 2019, 1:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading