अर्थव्यवस्था, मोदींचे मंत्रीमंडळ यावरून रघुराम राजन यांचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप

अर्थव्यवस्था, मोदींचे मंत्रीमंडळ यावरून रघुराम राजन यांचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप

देशात मोठे पुतळे उभारण्याऐवजी शाळांची उभारणी करा, रघुराम राजन यांचा मोदी सरकारला सल्ला

  • Share this:

नवी दिल्ली, 09 डिसेंबर : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीका केली आहे. हिंदू राष्ट्रवादाने फक्त सामाजिक तणाव वाढेल असं नाही तर देशाला आर्थिक विकासापासून दूर नेण्यातही याचा वाटा असेल असं परखड मत रघुराम राजन यांनी इंडिया टुडे मॅगझिनमध्ये मांडलं आहे. मोदी सरकारच्या सामाजिक आणि राजकीय धोरणांवरही त्यांनी मत व्यक्त केलं आहे.

रघुराम राजन म्हणाले की, सरकारने देशात राष्ट्रपुरुष आणि धार्मिक महापुरुषांचे मोठे पुतले उभारण्याऐवजी अद्ययावत तंत्रज्ञान असलेल्या आधुनिक शाळा आणि विद्यापीठांची उभारणी केली पाहिजे. लहान मुलांना चांगलं शिक्षण देण्यासाठी आणि उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी यामुळे मदत होईल.

भारताच्या आर्थिक परिस्थितीवर भाष्य करताना रघुराम राजन म्हणाले की, देशाच्या आर्थिक विकासाचा आलेख घसरत चालला आहे. अर्थव्यवस्था कमकुवत झाल्याचं दिसत आहे. अशा परिस्थितीतही पंतप्रधान कार्यालयाकडून सर्व गोष्टी चालवल्या जात आहे. मंत्र्यांच्या हातात काहीच अधिकार नसल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केली आहे. सरकारमध्ये असलेल्यांमध्ये सत्ता अबाधित ठेवणं तसंच सर्वांवर नियंत्रण ठेवण्याची सवय असते आणि सध्याचं सरकारही त्याला अपवाद नाही असंही रघुराम राजन यांनी नमूद केलं.

मोदी सरकारमध्ये होणारे निर्णय हे पंतप्रधान कार्यालयातील काही लोक घेतात असं रघुराम राजन म्हणाले. सत्ताधारी पक्षाचे राजकीय आणि सामाजिक कार्यक्रम लोकांपर्यंत पोहचवण्यास या निर्णयाने मदत होत असली तरी यामुळे आर्थिक सुधारणांकडे दुर्लक्ष होत आहे. देशाची अर्थव्यवस्था देशपातळीवर नव्हे तर राज्यपातळीवर कशी काम करते याचं ज्ञान संबंधितांना नाही. त्यामुळे त्यांचे निर्णय अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यात अपयशी ठरत आहेत असल्याचं रघुराम राजन यांनी म्हटलं आहे.

First published: December 9, 2019, 11:11 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading