• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • राज्यसभेचे माजी खासदार आणि पत्रकार चंदन मित्रा यांचं निधन, पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

राज्यसभेचे माजी खासदार आणि पत्रकार चंदन मित्रा यांचं निधन, पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

राज्यसभेचे माजी खासदार (Former Rajya Sabha MP) आणि पत्रकार चंदन मित्रा (Chandan Mitra Passes Away) यांचं बुधवारी रात्री दिल्लीत निधन झालं.

 • Share this:
  नवी दिल्ली, 02 सप्टेंबर:  Chandan Mitra passes away: राज्यसभेचे माजी खासदार (Former Rajya Sabha MP) आणि पत्रकार चंदन मित्रा (Chandan Mitra Passes Away) यांचं बुधवारी रात्री दिल्लीत निधन झालं. 65 व्या वर्षी मित्रा यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. चंदन मित्रा यांचा मुलगा कुशान मित्रा यांनी यासंदर्भातली माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मित्रा यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. मित्रा द पायनियरचे संपादक आणि व्यवस्थापकीय संचालक होते. चंदन मित्रा भाजपच्या कोट्यातून राज्यसभेत पोहोचले. मित्रा ऑगस्ट 2003 ते 2009 पर्यंत राज्यसभेचे सदस्य होते. जून 2010 मध्ये ते मध्य प्रदेशमधून भाजपकडून राज्यसभेत निवडून आले. मात्र 2018 मध्ये त्यांनी भाजपला रामरामकरत ममता बॅनर्जींचा पक्ष तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. भारतावर दहशतवादी हल्ल्याचं सावट, गुप्तचर यंत्रणांनी जारी केला अलर्ट 2016 पर्यंत ते राज्यसभेचे सदस्य होते. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे मित्रा हे निकटवर्तीय होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन मित्रा यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदींनी Tweet मध्ये लिहिलं की, चंदन मित्रा त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे आणि अंतर्दृष्टीमुळे कायम स्मरणात राहतील. राजकारणासोबतच माध्यमांच्या जगातही त्यांनी स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. त्यांच्या निधनामुळे मी दुःखी असून त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करतो. ओम शांती.
  Published by:Pooja Vichare
  First published: