मराठी बातम्या /बातम्या /देश /कॅप्टन अमरिंदर सिंग यांचं शरद पवारांच्या पावलावर पाऊल, लवकरच लॉन्च करणार स्वतःचा नवा पक्ष, BJPशी करणार हातमिळवणी?

कॅप्टन अमरिंदर सिंग यांचं शरद पवारांच्या पावलावर पाऊल, लवकरच लॉन्च करणार स्वतःचा नवा पक्ष, BJPशी करणार हातमिळवणी?

पंजाबच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय घडामोडी घडणार आहेत.

पंजाबच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय घडामोडी घडणार आहेत.

पंजाबच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय घडामोडी घडणार आहेत.

चंदीगड, 20 ऑक्टोबर: पंजाबचे माजी मुख्यमंत्री(Former Punjab Chief Minister) कॅप्टन अमरिंदर सिंग (Captain Amarinder Singh) यांनी नवीन पक्ष स्थापनेची (Formation of a new party) घोषणा केली आहे. पंजाबच्या माजी मुख्यमंत्र्यांचे मीडिया सल्लागार रवीन ठुकराल यांनी मंगळवारी अनुक्रमे ट्विट करून ही माहिती दिली. त्यांनी माजी मुख्यमंत्र्यांच्या हवाल्यानं लिहिलं की, पंजाब आणि त्या लोकांसाठी ज्यात शेतकऱ्यांचाही समावेश आहे त्यांच्या चांगल्यासाठी लवकरच माझा नवीन राजकीय पक्ष स्थापन करेन.

शरद पवारांच्या पावलावर पाऊल

पंजाबमध्ये ज्या पद्धतीनं अमरिंदर सिंग हे नवा पक्षा स्थापन करणार आहेत. त्याप्रमाणे खूप वर्षांआधी महाराष्ट्रातही असंच घडलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस सोडली. त्यानंतर शरद पवार वेगळ्या पक्षात प्रवेश करणार अशी चर्चां रंगू लागल्या होत्या. मात्र त्यांनी तसं न करता स्वबळावर राष्ट्रवादी काँग्रेस हा नवा पक्ष स्थापन केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आता 22 हून अधिक वर्ष होऊन गेली आहेत.

कॅप्टन अमरिंदर सिंग पंजाबच्या मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार झाल्यानंतर मोठा राजकीय भूकंप झाला होता. त्यांच्या जागी नव्या मुख्यमंत्र्यांची नियुक्तीही करण्यात आली. त्यानंतर कॅप्टन भाजपत प्रवेश करणार अशा चर्चा रंगू लागल्या होत्या.

ठुकराल यांनी पुढे लिहिलं, "शेतकरी आंदोलनावर तोडगा निघणार असेल तर नव्या पक्षासह मी भाजपशी युती करेन आणि 2022 मध्ये होणाऱ्या पंजाब विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपसोबत जागावाटपाच्या करारावर चर्चा करेन. तसेच समविचारी पक्ष जसे अकाली गट, विशेषत: भिंडसा आणि ब्रह्मपुरा गटासोबत युतीचाही मी विचार करत आहे.

मी माझ्या लोकांचे आणि माझ्या राज्याचे भविष्य सुरक्षित करेपर्यंत मी शांत बसणार नाही. पंजाबला राजकीय स्थिरता आणि अंतर्गत आणि बाह्य धोक्यांपासून संरक्षण आवश्यक आहे, असं ट्विटही पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचे मीडिया सल्लागार रवीन ठुकराल यांनी ट्विट केलं आहे.

काही दिवसांपूर्वी पंजाबमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. काँग्रेस नेतृत्वाने कॅप्टन अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीमाना देण्याचे आदेश दिले. त्यानंतर चरणजीत सिंग चन्नी यांच्याकडे पंजाबचा कारभार सोपवला.

हेही वाचा- VIDEO : 3000 मृतदेहांचे शवविच्छेदन केलेल्या डॉक्टरांचा असा झाला धक्कादायक मृत्यू; नाचता-नाचताच घडलं असं

 त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून अमरिंदर सिंग नाराज होते. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी थेट दिल्ली गाठत भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर कॅप्टन भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र आता ते भापजमध्ये थेट प्रवेश करणार नसून नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. पक्ष स्थापन केल्यानंतर भाजपसोबत युती करण्याची शक्यता देखील सांगितली आहे.

असं मानलं जातं की, अमरिंदर यांच्या या निर्णयानंतर पंजाब विधानसभा निवडणुका रंजक होऊ शकतात. अमरिंदर सिंग यांच्या नव्या पक्षाच्या (Captain Amarinder to Float New Party) घोषणेनंतर पंजाबमध्ये राजकीय खळबळ उडाली आहे.

First published:
top videos

    Tags: BJP, Punjab, काँग्रेस, शरद पवार