SPECIAL राजकारणासाठी कोण जास्त योग्य आहे, प्रियंका की राहुल? राजीव गांधींच हे होतं उत्तर!

SPECIAL राजकारणासाठी कोण जास्त योग्य आहे, प्रियंका की राहुल? राजीव गांधींच हे होतं उत्तर!

'मुलांनी त्यांना आवडतं ते करावं, त्यांनी त्यांच्या मार्गानी जावं. तुम्ही हेच करा किंवा तेच करा असं मी त्यांना काही सांगणार नाही.'

  • Share this:

नवी दिल्ली 06 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातल्या प्रचारसभेत राहुल गांधी यांच्यावर टीका करताना माजी पंतप्रधान राजीव गांधींचा उल्लेख केला. त्यावरून देशभर वादळ निर्माण झालंय. काँग्रेसने पंतप्रधान मोदींवर यावरून जोरदार हल्लाबोल केलाय. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर राजीव गांधी यांची एक जुनी मुलाखत पुन्हा एकदा व्हायरल होतेय. प्रसिद्ध मुलाखतकार सीमी गरेवाल यांनी 80 च्या दशकाच्या शेवटी राजीव गांधी यांच्यावर एक डॉक्युमेंटरी केली होती. त्यासाठी त्यांनी राजीव गांधी यांची दीर्घ मुलाखत घेतली होती. त्यात त्यांना प्रियंका गांधी आणि राहुल राजकारणात येतील का? आणि या दोघांपैकी राजकारणात जास्त कोण योग्य असेल? असे अनेक प्रश्न विचारले होते. या मुलाखतीत त्यांनी सगळ्या प्रश्नांची दिलखुलास उत्तर दिलीत.

अपघाताने राजकारणात

संजय गांधी यांचा अपघाती मृत्यू. त्यानंतर इंदिरा गांधी यांच्या आग्रहाखातर इच्छा नसतानाही पायलट असलेले राजीव गांधी राजकारणात आले. त्यानंतर इंदिरा गांधी यांची हत्या झाली. राजीव गांधी देशाचे पंतप्रधान झाले आणि त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. राजकारणात कधीच प्रवेश करणार नाही असं त्यांचं मत होतं मात्र परिस्थितीने त्यांना राजकारणात आणलं.


कसे आहेत प्रियंका आणि राहुल?

त्यावेळी राहुल आणि प्रियंका हे शालेय विद्यार्थी होते. त्यांच्याविषयी बोलताना राजीव गांधी म्हणाले, पंतप्रधान झाल्यावर माझं आयुष्यच बदलून गेलंय. आता सुरक्षेमुळे अनेक बंधणं आलीत. मुलांचंही आयुष्य बदलून गेलं. त्यांन कायम सुरक्षेच्या घेऱ्यातच राहावं लागतं. राहुल हा मोकळा ढाकळा आहे, त्याला बोलायला फिरायला आवडतं. तो संवेदनशील आहे. आणि प्रियंका ही माझ्या आईवर म्हणजे इंदिराजींवर गेलीय. ती दृढनिश्चयी आणि कणखर आहे असं निरिक्षणही राजीव गांधी यांनी व्यक्त केलं.

मुलं राजकारणात येणार?

या दोन मुलांपैकी राजकारणासाठी कोण योग्य आहे? या प्रश्नावर राजीव गांधी म्हणाले, अजुनही ते लहान आहेत. भविष्यात काय लिहिलं आहे ते आताच सांगता येणार नाही. मलाही राजकारणात येण्याची इच्छा नव्हती मात्र यावं लागलं. मुलांनी त्यांना आवडतं ते करावं, त्यांनी त्यांच्या मार्गानी जावं. तुम्ही हेच करा किंवा तेच करा असं मी त्यांना काही सांगणार नाही. त्यांना जे योग्य वाटेल ते त्यांनी करावं असा वडिलकीचा सल्लाही त्यांनी मुलांना दिला.

जे राजीव गांधी यांच्या वाट्याला आलं तेच नंतर सोनिया गांधी यांना करावं लागलं. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर काही वर्षांनी राजकारणात कधीच पाऊन न ठेवण्याचा निश्चय केलेल्या सोनिया गांधी राजकारणात आल्या आणि नंतर राहुल गांधी आणि प्रियंका यांनाही राजकारणात यावं लागलं. आता तर राहुल गांधी हे पंतप्रधानपदाचेही उमेदवार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 6, 2019 06:30 PM IST

ताज्या बातम्या