माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रकृती बिघडली, एम्समध्ये दाखल

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रकृती बिघडली, एम्समध्ये दाखल

भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना हृदयविकाराचा त्रास असून छातीत दुखायला लागल्यानं त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 10 मे : देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांची प्रकृती बिघडल्यानं दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं आहे. रविवारी सायंकाळच्या सुमारास त्यांच्या छातीत दुखायला लागले. त्यानंतर डॉक्टर मनमोहन सिंग यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून प्रकृतीबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.

एम्समध्ये त्यांना कार्डियो थोरासिक वॉर्डमध्ये दाखल कऱण्यात आलं आहे. माजी पंतप्रधान आणि काँग्रेस नेते  मनमोहन सिंग यांना हृदयाचा विकार आहे. सध्या 87 वर्षांचे असलेले मनमोहन सिंग यांनी युपीए सरकारच्या काळात सलग दोन टर्म पंतप्रधान पद भूषवलं आहे.

मनमोहन सिंग यांनी 2004 ते 2014 या काळात देशाच्या पंतप्रधान पदाची धुरा सांभाळली. त्याआधी त्यांनी 1991 मध्ये नरसिंहा राव यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून काम पाहिलं होतं. कोरोनामुळे सध्या उद्भवलेल्या स्थितीसाठी काँग्रेसनं एक समिती तयार केली आहे. त्याचं अध्यक्षपदही त्यांच्याकडेच आहे.

हे वाचा : सलाम! मुलीच्या शिक्षणासाठी साठवलेले पैसे लोकांच्या मदतीसाठी केले खर्च

First published: May 10, 2020, 10:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading