अटलबिहारी वाजपेयींची प्रकृती स्थिर, मोदी-शहांनी घेतली भेट

अटलबिहारी वाजपेयींची प्रकृती स्थिर, मोदी-शहांनी घेतली भेट

  • Share this:

नवी दिल्ली, 11 जून :  माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना एम्स हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. त्यांची प्रकृती स्थिर असून उद्या सकाळी डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती डाॅक्टरांनी दिली.

आज संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी एम्स हाॅस्पिटलमध्ये जाऊन वाजपेयी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींनीही हाॅस्पिटलमध्ये जाऊन तब्येतची विचारपूस केली. तर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीही एम्स हाॅस्पिटलमध्ये जाऊन वाजपेयींची भेट घेतली होती.

अटलबिहारी वाजपेयी यांच्या रुटीन चेकअॅपसाठी सोमवारी सकाळी दिल्लीतील एम्स हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.

रुटीन चेकअॅपसाठी दाखल करण्यात आल्यानंतर डाॅक्टरांच्या सल्ल्यानंतर वाजपेयींनी हाॅस्पिटलमध्ये दाखल करून घेतलंय.

एम्सचे संचालक डाॅ.रणदीप गुलेरिया यांच्या देखरेखीखाली वाजपेयी यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलंय.

अटलबिहारी वाजपेयी गेल्या काही दिवसांपासून डिमेंशिया या आजाराने ग्रस्त आहे. प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे सार्वजनिक कार्यक्रमापासून ते दूर राहिले. गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वीच भारताचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार 'भारतरत्न'ने त्यांना सन्मानित करण्यात आलं. हा पुरस्कारही त्यांना घरी जाऊन देण्यात आला होता.

भाजपचे संस्थापक सदस्यांमध्ये वाजपेयी हे तीन वेळा देशाचे पंतप्रधान राहिले. वाजपेयी हे पहिले असे गैर-काँग्रेसी पंतप्रधान आहे त्यांनी आपला पंतप्रधानपदाचा कार्यकाळ पूर्ण केलाय.

First Published: Jun 11, 2018 08:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading