'लोकसभेच्या जागा 1 हजार कराव्यात', माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मांडली बाजू

'लोकसभेच्या जागा 1 हजार कराव्यात', माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मांडली बाजू

देशातील लोकसभा मतदारसंघांच्या जागा 1977 मध्ये वाढवण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पुन्हा त्या वाढवल्या पाहिजेत असं म्हणत बाजू मांडली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 डिसेंबर : देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सोमवारी एका कार्यक्रमात बोलताना लोकसभेच्या जागा वाढवण्याबाबत वक्तव्य केलं. लोकसभेच्या जागा 543 वरून 1000 कराव्यात आणि राज्यसभेच्याही जागा वाढवण्यासाठी त्यांनी बाजू मांडली. सध्याच्या लोकसभा मतदारसंघाचे क्षेत्र निवडून आलेल्या प्रतिनिधींसाठी प्रमाणापेक्षा मोठं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.

अटल बिहारी वाजपेयी स्मृती व्याख्यानमालेत प्रणव मुखर्जी म्हणाले की, लोकसभेच्या क्षमतेला 1977 मध्ये सुधारीत केलं होतं. यासाठी 1971 च्या जनगणनेचा आधार घेतला होता. त्यावेळी देशाची लोकसंख्या 55 कोटी इतकी होती. आता लोकसंख्या दुपटीने वाढली आहे. त्यामुळे लोकसभा मतदारसंघ वाढवणे गरजेचे आहे त्यासाठी हे एक महत्त्वाचं कारण आहे.

लोकसभेच्या जागांची संख्या वाढवून ती 1 हजार करायला पाहिजे असं मत व्यक्त करताना प्रणव मुखर्जी यांनी लोकप्रतिनिधींसाठी सध्याचा मतदारसंघ खूप मोठा आहे. वाढती लोकसंख्या, समस्या आणि त्याकडे लक्ष देणं खूप आव्हानात्मक असल्याचंही माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी म्हणाले.

1952 पासून जनतेने वेगवेगळ्या पक्षांना बहुमत दिलं आहे. मात्र कधीच एका पक्षाला 50 टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळालेली नाहीत. निवडणुकीत बहुमत तुम्हाला एक स्थिर सरकार स्थापन करण्याचा अधिकार देते असंही मुखर्जी यांनी म्हटलं.

एक देश एक निवडणूक याबाबत बोलताना प्रणव मुखर्जी यांसाठी आपण सहमत नसल्याचं म्हटलं आहे. त्यांनी म्हटलं की, संविधानात दुरुस्ती करून असं करता येतं. पण भविष्यात लोकप्रतिनिधी सरकारव अविश्वास दाखवणार नाहीत याची काय शाश्वती.

Published by: Suraj Yadav
First published: December 17, 2019, 7:13 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading