राजीव गांधींनी इंदिराजींच्या हत्येदिवशीच घेतली होती पंतप्रधानपदाची शपथ!

28 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी गेले असताना राजीव गांधी यांची हत्या झाली होती.

  • Share this:

इंदिरा गांधी आणि फिरोज गांधी यांचा मोठा मुलगा राजीव गांधी यांच जन्म २० ऑगस्ट १९४४ मध्ये मुंबई येथे झाला. राजीव गांधी यांचे आजोबा जवाहरलाल नेहरू हे देशाचे पहिले पंतप्रधान होते.

राजीव यांचे सुरूवातीचे शिक्षण देहरादूनच्या प्रसिद्ध दून शाळेत झले. राजीव यांनी १९६५ मध्ये ब्रिटनच्या कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीच्या इम्पेरियल कॉलेजमधून इंजीनिअरिंगचे शिक्षण घेतले.

लंडनमध्ये शिक्षण घेत असताना त्यांची ओळख सोनिया यांच्याशी झाली. दोघांनी १९६८ मध्ये पारंपरिक पद्धतीने लग्न केले.

भारतात परतल्यानंतर राजीव यांनी कमर्शियल पायलटचे लायसन्स मिळवले. १९६८ मध्ये पायलट म्हणून ते नोकरी करत होते

छोटा भाऊ संजय गांधी यांची २३ जून १९८० मध्ये एका विमान दुर्घटनेत मृत्यू झाला. संजय यांच्या मृत्यूनंतर राजीव यांनी आई इंदिरा गांधी यांच्या मदतीसाठी राजकारणात पाऊल ठेवले.

राजीव गांधी जून १९८१ मध्ये अमेठी लोकसभेच्या निवडणुकीत जिंकून आले. या यशामुळे त्यांच्यासाठी संसदेची दारं उघडली गेली.

३१ ऑक्टोबर १९८४ मध्ये आई इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर त्याच दिवशी ४० वर्षीय राजीव यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली.

काँग्रेसने ५०८ मतांपैकी रेकॉर्ड ब्रेक ४०१ बिनशर्त मतं मिळवली.

१९८९ मध्ये बोफोर्स घोटाळ्यामुळे काँग्रेस सत्तेपासून दूर झाली.

२१ मे १९९१ मध्ये निवडणुकांच्या सभांसाठी राजीव गांधी तामिळनाडूच्या श्रीपेरंबदुर येथे गेले असता, एका आत्मघाती हल्ल्यात राजीव यांची हत्त्या करण्यात आली.

राजीव गांधी यांच्या मृत्यूनंतर त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 21, 2019 09:38 AM IST

ताज्या बातम्या