माजी पंतप्रधानांच्या सल्लागाराने मागितली Online दारु, 8वी पास तरुणाने घातला गंडा

माजी पंतप्रधानांच्या सल्लागाराने मागितली Online दारु, 8वी पास तरुणाने घातला गंडा

आरोपी 8वी पास असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. वेगवेगळ्या सीमकार्ड्सवरून तो ग्राहकांना फोन करायचा आणि देशातल्या विविध बँकांमधल्या अकाउंटसमध्ये ते पैसे ट्रान्स्फर करत असे.

  • Share this:

नवी दिल्ली 28 जून: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग ( Former Prime Minister Manmohan Singh) यांचे माध्यम सल्लागार संजय बारू (Sanjay Baru) यांची लॉकडाउनच्या(Lockdown) काळात फसवणूक झाल्याची माहिती पुढे आली आहे. लॉकडाउनच्या दुसऱ्या टप्प्यात सरकारने दारु विक्रीला (online liquor) परवानगी दिली होती. त्यावेळी संजय बारू यांनी एका फेसबुक पेजवरून Online दारुची ऑर्डर दिली. त्यावेळी पेमेंट करतांना त्यांना 24 हजारांनी फसविण्यात आल्याचं आल्याचं उघड झालं आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. ‘आज-तक’ने हे वृत्त दिलं आहे.

दारु विक्रीला परवानगी दिल्यानंतर दिल्लीत घरपोच दारुविक्रीचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानंतर बारू यांनी शोध घेतल्यानंतर त्यांना फेसबुकवर La Cave Wine shop हे पेज सापडलं त्यानंतर त्यांनी तिथे ऑर्डर दिली. त्यावेळी पेमेंट करताना त्यांच्या अकाऊंटमधून त्यांनी 24 हजार हजार रुपये दिले. त्यानंतर त्या भामट्यांनी आपला फोन बंद केला. तेव्हा आपण फसवलो गेलो हे त्यांच्या लक्षात आलं.

त्यांनी दिल्ली पोलिसांकडे त्याची तक्रार केली. पोलिसांनी आरोपीला राजस्थानमधून अटक केली आहे. अकिब जावेद असं त्याचं नाव असून तो 8वी पास असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. वेगवेगळ्या सीमकार्ड्सवरून तो ग्राहकांना फोन करायचा आणि देशातल्या विविध बँकांमधल्या अकाउंटसमध्ये ते पैसे ट्रान्स्फर करत असे, जावेद हा ओला कॅबचा ड्रायव्हर असून पैशाच्या मोहापाई त्याने हे काळे धंदे सुरू केले होते.

हे वाचाबापरे! Lockdownच्या काळात दुप्पट झाल्या आत्महत्या, ही 5 कारणं ठरली जीवघेणी

संजय बारू यांचं The accidental prime minister हे पुस्तक खूप गाजलं होतं. त्यावरून देशभर वादळही निर्माण झालं होतं. नंतर त्यावर चित्रपटही निघाला होता. पंतप्रधान कार्यातल्यातल्या अनुभवांवर त्यांनी हे पुस्तक लिहिलं आहे.

संपादन - अजय कौटिकवार

First published: June 28, 2020, 9:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading