'नोटाबंदी आणि GST...मोदींच्या चुकीच्या निर्णयामुळे देशात आर्थिक मंदी', माजी पंतप्रधानांची टीका

'नोटाबंदी आणि GST...मोदींच्या चुकीच्या निर्णयामुळे देशात आर्थिक मंदी', माजी पंतप्रधानांची टीका

सरकारच्या चौफेर गैरव्यावस्थापनामुळे देशात आर्थिक मंदी आली आहे, अशी टीका माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 1 सप्टेंबर : पंतप्रधान मोदी यांच्या सरकारनं अर्थव्यवस्थेचं चौफेर गैरव्यावस्थापन केल्यानं देशात आर्थिक मंदी आली आहे, अशी टीका माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी केली आहे. 'अर्थव्यवस्थेची आजची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे, जीडीपी वाढीचा दर 5 टक्के आहे, याचा अर्थ आपण मंदीच्या फेऱ्यात अडकलो आहोत,' असंही मनमोहन सिंग यांनी म्हटलं आहे.

'मोदी सरकारने द्वेषाचं राजकारण सोडून भारतीय अर्थव्यवस्थेला मानवनिर्मित संकटातून बाहेर काढावं. यासाठी आर्थिक विषयाचं ज्ञान असलेल्या लोकांशी संपर्क करायला हवा,' असा सल्ला अर्थतज्ञ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनमोहन सिंग यांनी सरकारला दिला आहे.

कशामुळे ढासळली भारतीय अर्थव्यवस्था?

नोटाबंदीचा निर्णय आणि जीएसटीच्या अंमलबजावणीतील घोळ यामुळे हे मानवनिर्मित संकट उभ राहिल्याचं डॉ. सिंग यांनी म्हटलं आहे. 'देशातील तरुण वर्ग, शेतकरी, मजूर, व्यावसायिक आणि गरिबांना चांगल्या सोई-सुविधा मिळायला हव्यात. मी सरकारला विनंती करतो की, द्वेषाचं राजकारण सोडा आणि अर्थव्यवस्थेला या मानवनिर्मित संकटातून बाहेर काढा,' असं आवाहन मनमोहन सिंग यांना सरकारला केलं आहे.

नीती आयोगानेही केले होतं भाष्य

भारतीय अर्थव्यवस्था धोक्यात आल्याची कबुली नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी दिली आहे. गेल्या 70 वर्षात सध्या अर्थव्यवस्थेची स्थिती सर्वात वाईट झाली आहे. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे अर्थव्यवस्थेची स्थिती वाईट झाल्याचं आता नीती आयोगाने मान्य केल्याने केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला चागंलाच धक्का बसला आहे.

'खाजगी कंपन्यांना विश्वासात घ्यायला हवं. पूर्ण वित्तीय प्रणालीसाठी सध्याचा काळ जोखमीचा आहे. याआधी 35 टक्के रोकड उपलब्ध होती. पण आता तीही उपलब्ध नाही. या सर्व कारणांमुळे अर्थव्यवस्था अत्यंत ढासळली आहे,' अशी कबुली नीती आयोगाच्या राजीव कुमार यांनी दिली आहे.

देशात आर्थिक मंदी येणार असल्याचा इशारा तज्ज्ञांकडून दिला जात आहे. भारताची अर्थव्यवस्था गंभीर स्थितीत आहे. गेल्या आर्थिक वर्षात एक कोटी 10 लाख लोकांचा रोजगार गेला, अशी आकडेवारी आहे.

देशातल्या तरुणांना बेरोजगारीची चिंता भेडसावत आहे. देशभरात 7 कोटी 80 लाख व्यक्ती बेरोजगार आहेत. या सगळ्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला असून भारताची अर्थव्यवस्था ढासळून गेली आहे. दुचाकी वाहनांची विक्री 17 टक्क्याने तर चारचाकी वाहनांची विक्री 23 टक्याने घटली आहे. बांधकाम क्षेत्रातही मंदी आहे. 30 मोठ्या शहरांत सुमारे साडेचार लाख घरं पडून आहेत. अतिश्रीमंताच्या उत्पन्नावरचा प्राप्तिकर अधिभार वाढवल्यामुळे विदेशी गुंतवणूकदारांनीही शेअर बाजारातून गुंतवणूक काढली आहे. यामुळे आगामी काळात अर्थव्यवस्थेला उभारी देण्याचं मोठं आव्हान सरकारसमोर आहे.

जेलमध्ये कुख्यात गुंडाची बर्थडे पार्टी; केकसह मटणाचा बेत VIDEO VIRAL

Published by: Akshay Shitole
First published: September 1, 2019, 4:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading