...तर मनमोहन सिंगांनी केला असता पाकिस्तानवर हल्ला, ब्रिटनच्या माजी पंतप्रधानांचा गौप्यस्फोट

...तर मनमोहन सिंगांनी केला असता पाकिस्तानवर हल्ला, ब्रिटनच्या माजी पंतप्रधानांचा गौप्यस्फोट

' मनमोहन सिंग हे जेवढे मृदू आहेत तेव्हढेच ते कठोरही होवू शकतात. पाकिस्तानबाबतही ते आक्रमक होते '

  • Share this:

लंडन 19 सप्टेंबर : भारत आणि पाकिस्तानदरम्यान सध्या तणाव आहे. काश्मीरमधून 370वं कलम हटविल्यानंतर या तणावात जास्त भर पडलीय. पाकिस्तानी नेते दररोज भारताला युद्धाची धमकी देत आहेत. तर केंद्र सरकार पाकिस्तानच्या धमक्यांना बीक घालत नाहीये. अशा पार्श्वभूमीवर ब्रिटनचे(United Kingdom) माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमरून (David Cameron) यांनी एक मोठा गोप्यस्फोट केलाय. कॅमरून यांचं आत्मचरित्र For the Record नुकतच प्रसिद्ध झालंय त्यात हा गौप्यस्फोट करण्यात आलाय.  मुंबईवर झालेला 26/11सारखा हल्ला जर पुन्हा झाला असता तर तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh) हे पाकिस्तानवर लष्करी कारवाई करण्याच्या विचारात होते असं कॅमरून यांनी आपल्या आत्मचरित्रात म्हटलं आहे.

महाराष्ट्र, हरियाणासोबत झारखंड विधानसभा निवडणुकीची घोषणा नाही?

डेव्हिड कॅमरून हे 2010 ते 2016 या काळात ब्रिटनचे पंतप्रधान होते. त्याकाळात त्यांनी दोनवेळा भारतला भेटही दिली होती आणि जगातल्या विविध व्यासपीठांवर ते पंतप्रधान मनमोहन सिंग यांना भेटलेही होते. त्यांच्याशी झालेल्या संवादावरून त्यांनी हे मत व्यक्त केलंय. त्याचबरोबर मनमोहन सिंग यांच्या अनेक आठवणीही त्यांनी आपल्या आत्मचरित्रात सांगितल्या आहेत. कॅमरून यांनी मनमोहन सिंग यांचा उल्लेख अतिशय सभ्य असा संत माणून म्हणून केलाय. मनमोहन सिंग हे जेवढे मृदू आहेत तेव्हढेच ते कठोरही होवू शकतात असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

'विक्रम'चे फोटो टिपण्यात NASA अपयशी, सांगितलं काय झालं?

भारतीय वंशाच्या माणसांनी ब्रिटनच्या सर्वच क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केलीय. या माणसांच्या योगदानामुळे ब्रिटनच्या वैभवात मोठी भर पडल्याचंही त्यांनी आपल्या आत्मचरित्रात म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 19, 2019 04:03 PM IST

ताज्या बातम्या