घसरलेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा येतील अच्छे दिन, मनमोहन सिंग यांनी PM मोदींना दिला 'हा' मंत्र

मनमोहन सिंग यांनी अर्थव्यवस्थेबाबत पुन्हा एकदा भाष्य करत अर्थव्यवस्थेतील सुधारणांबाबत केंद्र सरकारला सल्ला दिला आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 8, 2019 02:25 PM IST

घसरलेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा येतील अच्छे दिन, मनमोहन सिंग यांनी PM मोदींना दिला 'हा' मंत्र

नवी दिल्ली, 8 सप्टेंबर : भारताची अर्थव्यवस्था सध्या मोठ्या आव्हानांचा सामना करत आहे. देशात आर्थिक मंदीची स्थिती आहे. काही दिवसांपूर्वीच माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी या स्थितीबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा मनमोहन सिंग यांनी अर्थव्यवस्थेबाबत भाष्य करत अर्थव्यवस्थेतील सुधारणांबाबत केंद्र सरकारला सल्ला दिला आहे.

'देशातील आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी एलपीजी म्हणजेच उदारीकरण, खासगीकरण आणि जागतिकीकरण या नीतीला प्राधान्य द्यायला हवं. याआधारे भारताला 5 हजार अरबी डॉलरची अर्थव्यवस्था बनवणं शक्य आहे,' असा विश्वास डॉ. सिंग यांनी व्यक्त केला आहे.

मनमोहन सिंग हे अर्थमंत्री असतानाच 1991 साली देशात खुल्या आर्थिक धोरणांचा अवलंब करण्यात आला होता. त्यानंतर अनेकदा देशाची अर्थव्यवस्था अडचणीत असताना त्यामध्ये सुधारणा करण्यात मनमोहन सिंग यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यामुळे मनमोहन सिंग यांनी सरकारला दिलेला सल्ला सरकार गंभीरपणे घेण्याची शक्यता आहे.

'नोटाबंदी आणि GST...मोदींच्या चुकीच्या निर्णयामुळे देशात आर्थिक मंदी'

पंतप्रधान मोदी यांच्या सरकारनं अर्थव्यवस्थेचं चौफेर गैरव्यावस्थापन केल्यानं देशात आर्थिक मंदी आली आहे, अशी टीका माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी केली आहे. 'अर्थव्यवस्थेची आजची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे, जीडीपी वाढीचा दर 5 टक्के आहे, याचा अर्थ आपण मंदीच्या फेऱ्यात अडकलो आहोत,' असंही मनमोहन सिंग यांनी म्हटलं आहे.

Loading...

'मोदी सरकारने द्वेषाचं राजकारण सोडून भारतीय अर्थव्यवस्थेला मानवनिर्मित संकटातून बाहेर काढावं. यासाठी आर्थिक विषयाचं ज्ञान असलेल्या लोकांशी संपर्क करायला हवा,' असा सल्ला अर्थतज्ञ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनमोहन सिंग यांनी सरकारला दिला आहे.

कशामुळे ढासळली भारतीय अर्थव्यवस्था?

नोटाबंदीचा निर्णय आणि जीएसटीच्या अंमलबजावणीतील घोळ यामुळे हे मानवनिर्मित संकट उभ राहिल्याचं डॉ. सिंग यांनी म्हटलं आहे. 'देशातील तरुण वर्ग, शेतकरी, मजूर, व्यावसायिक आणि गरिबांना चांगल्या सोई-सुविधा मिळायला हव्यात. मी सरकारला विनंती करतो की, द्वेषाचं राजकारण सोडा आणि अर्थव्यवस्थेला या मानवनिर्मित संकटातून बाहेर काढा,' असं आवाहन मनमोहन सिंग यांना सरकारला केलं आहे.

VIDEO: बोलता येत नाही, ऐकूही येत नाही, विद्यार्थिनीनं अशी अनोख्या पद्धतीने दिली गणेशवंदना

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 8, 2019 02:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...