Home /News /national /

पाकचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या आईचं निधन; PM मोदींनी व्यक्त केला शोक

पाकचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या आईचं निधन; PM मोदींनी व्यक्त केला शोक

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या पत्रात नवाज शरीफ यांच्या आईच्या भेटीचा एक प्रसंग नमूद केला आहे

    नवी दिल्ली, 17 डिसेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पाकिस्ताने माजी पंतप्रधान नवाज शरीफ ( Navaj Sharif) यांच्या आपल्या आईच्या निधनाबद्दल शोक संदेश पाठविला आहे. पाकिस्तानमधील भारतीय उच्चायुक्तांच्या वतीने हे पत्र पाकिस्तान मुस्लिम लीग नवाजचे उपाध्यक्ष आणि नवाज शरीफ यांची कन्या मरियम नवाज यांना देण्यात आलं आहे. 22 नोव्हेंबर रोजी ब्रिटनमध्ये नवाज शरीफ यांच्या आईचं निधन झालं होतं आणि नंतर त्यांचे पार्थिव पाकिस्तानमध्ये आणण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाठविलेल्या पत्रात शोक व्यक्त करताना त्यांनी नवाज शरीफ यांच्या आईशी झालेल्या त्यांच्या संक्षिप्त भेटीचाही उल्लेखही केला आहे. मोदींनी लिहिलं आहे की, त्यांच्यातील साधेपणा आणि उत्साह खूप कौतुकास्पद होता. नवाज यांच्या आईंनी लंडनमध्ये अखेरचा श्वास घेतला नवाज शरीफ यांची आई बेगम शमीम अख्तर 91 वर्षांच्या होत्या. गेल्या एक महिन्यापासून त्या आजारी होत्या. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये त्या लंडनमध्ये गेल्या होत्या आणि तेथे नवाज शरीफ आणि कुटुंबातील इतर सदस्यांसमवेत राहत होत्या. नवाज शरीफ हेही गेल्या एक वर्षांपासून लंडनमध्ये वास्तव्यास होते. लंडनमध्ये त्यांच्या आईच्या निधनानंतर, बेगम शमीम अख्तर यांचा मृतदेह लाहोरमधील जती उमरा येथील शरीफ घराण्याच्या वडिलोपार्जित गावी नेण्यात आला होता. पीएम मोदी डिसेंबर 2015 मध्ये काबूलहून भारतात परत येत असताना लाहोरला उतरले होते. तेथून ते हेलिकॉप्टरमार्गे रायविंदला गेले, तेथे त्यांनी नवाज शरीफ यांच्या नवासीच्या लग्नाला हजेरी लावली. दिल्लीला निघण्यापूर्वी त्यांनी पाकिस्तानी समकक्षांशीही संक्षिप्त भेट घेतली. गेल्या दशकापेक्षा अधिक काळात भारतीय पंतप्रधानांनी पाकिस्तानला दिलेली ही पहिली भेट होती.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Narendra modi

    पुढील बातम्या