पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ अत्यावस्थ

पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ अत्यावस्थ

पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांच्या हत्येचा कट रचल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे.

  • Share this:

दुबई 30 मे : पाकिस्तानचे माजी अध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांची प्रकृती अत्यवस्थ आहे. त्यांच्यावर दुबईतल्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेली काही महिने त्यांच्यावर दुबईतच उपचार सुरू होते. त्यांच्या प्रकृतीबाबात सोशल मीडियावर वेगवेगळ्या बातम्या येत आहेत त्या सगळ्या अफवा असून त्यांची प्रकृती गंभीर असली तरी उपचार सुरू आहेत असं स्पष्टीकरण त्यांच्या पक्षाच्या प्रवक्त्या मेहरीन मलिक यांनी दिलंय.

पाकिस्तानमधून निष्कासीत झाल्यानंतर ते दुबई आणि लंडन इथं राहत होते. गेल्या वर्षभरापासून ते दुबईतच वास्तव्यला होते. मुशर्रफ यांना Amyloidosis हा गंभीर आजार झाला असून या आजारावर ठोस उपचार नाही. त्यामुळे त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालल्याचं वृत्त खलिज टाईम्सने दिलं आहे.

नोव्हेंबर 2007 मध्ये संविधान गुंडाळून ठेवल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्यात कोर्टाने त्यांना दोषीही ठरवलं होतं. त्यानंतर मार्च 2016मध्ये ते उपचारासाठी दुबईला गेले होते त्यानंतर ते पाकिस्तानात कधीच परत आले नाहीत. बुधवारी त्यांना ICUमध्ये भरती करण्यात आलं. त्यांच्यावर उपचार सुरू असले तरी प्रकृती फारशी प्रतिसाद देत नाही असं वृत्त पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलं आहे. मुशर्रफ 75 वर्षांचे आहेत.

पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असलेल्या मुशर्रफ यांनी सत्ता उलथवून सर्व सत्ता आपल्या ताब्यात घेतली होती. 1999 ते 2008 एवढ्या काळ ते पाकिस्तानचे हुकूमशहाच होते. कारगिल युद्धाच्या काळात त्यांनीच हा कट रचल्याचा आरोपही करण्यात येतो. पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांच्या हत्येचा कट रचल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे.

First published: May 30, 2019, 9:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading