मराठी बातम्या /बातम्या /देश /

घुसखोरी करताना मारला गेला ISI चा मार्गदर्शक, मोबाईलमध्ये सापडले पाकिस्तान आर्मी अधिकाऱ्यांचे नंबर

घुसखोरी करताना मारला गेला ISI चा मार्गदर्शक, मोबाईलमध्ये सापडले पाकिस्तान आर्मी अधिकाऱ्यांचे नंबर

जम्मू काश्मीरमधल्या (Jammu and Kashmir) पुंछमधून (Poonch) एक महत्त्वाची अपडेट समोर येतेय.

जम्मू काश्मीरमधल्या (Jammu and Kashmir) पुंछमधून (Poonch) एक महत्त्वाची अपडेट समोर येतेय.

जम्मू काश्मीरमधल्या (Jammu and Kashmir) पुंछमधून (Poonch) एक महत्त्वाची अपडेट समोर येतेय.

  • Published by:  Pooja Vichare

श्रीनगर, 27 नोव्हेंबर: जम्मू काश्मीरमधल्या (Jammu and Kashmir) पुंछमधून (Poonch) एक महत्त्वाची अपडेट समोर येतेय. पुंछच्या भिबर गलीमध्ये घुसखोरी करताना पाकिस्तान लष्कराचा माजी हवालदार (Former Pakistan Army constable) मारला गेला आहे.

मारला गेलेल्या माजी हवालदाराचं नाव आरिफ हाजी असंआहे. तो एसएसजीचा माजी हवालदार होता. ठार झालेला आरिफ हाजी 1992 मध्ये कुटुंबासह पीओकेमध्ये पळून गेला होता. लष्कर अनेक वर्षांपासून त्याचा शोध घेत होते. त्यामुळे सुरक्षा दलाला मोठं यश आलं आहे.

काल पुंछ जिल्ह्यातील मेंढार सेक्टरमधील बालाकोट फॉरवर्डमध्ये लष्करानं घुसखोरीचा एक मोठा प्रयत्न हाणून पाडला. त्यात पाकिस्तानचा दहशतवादी आरिफ हाजी मारला गेला. आरिफकडून एक रायफल आणि इतर बुलेटच्या गोळ्या जप्त करण्यात आली असून एक फोन जप्त करण्यात आला आहे. ज्यामध्ये पाकिस्तान आर्मी आणि ISIच्या उच्च अधिकाऱ्यांचे नंबर सापडले आहेत.

हेही वाचा- Covid-19 Return: 'या' शहरात कोरोना Out Of Control, आणीबाणी जाहीर

हाजी मेंढरचा रहिवासी होता. कुटुंबासह पीओकेमध्ये पळून गेला होता. अनेक मोठ्या कारवायांमध्ये हाजीने पाकिस्तानी लष्कराला साथ दिली होती. पीओके सोडल्यानंतर हाजी पाकिस्तानी लष्करात दाखल झाला होता. निवृत्त झाल्यानंतर तो ISIच्या पे रोलवर कार्यरत होता. हाजीवर BAT (बॉर्डर अॅक्शन टीम) हल्ल्याचा आरोप होता.

भारतीय एजन्सी आणि सुरक्षा दल अनेक वर्षांपासून आरिफचा शोध घेत होते. पण प्रत्येक वेळी तो पळून जाण्यात यशस्वी व्हायचा.

हेही वाचा- IND vs NZ: पदार्पणापूर्वीच भरतची कमाल, पण त्याच्या नावावर होणार का रेकॉर्डची नोंद? वाचा सविस्तर

आरिफ हाजी हा प्रशिक्षित कमांडो होता. त्याला राजौरी आणि पुंछचे सर्व मार्ग माहित होते. तो पाकिस्तान लष्कर आणि ISIचा प्रशिक्षित मार्गदर्शक होता. ठार झालेला दहशतवादी हाजी याने यापूर्वी अनेकवेळा लष्कर, जैश आणि हिज्बुलच्या दहशतवाद्यांना घुसखोरी करुन दिली होती.

सध्या पाक सेनेनं पीओकेमध्ये बरीच जमीन दिली होती, तिथे तो दहशतवाद्यांना घुसखोरीचा मार्ग समजावून सांगायचा आणि लाँचिंग पॅडपर्यंत आणून दहशतवाद्यांना घुसखोरी करुन द्यायचा. 2018 मध्ये त्यानं नौशेरा सेक्टरमध्ये पाक लष्कराच्या कमांडोच्या सहकार्यानं बॅट हल्ला केला होता, ज्यामध्ये भारतीय लष्कराचे तीन जवान शहीद झाले होते, असा हाजीवर आरोप होता.

हेही वाचा- घरमालकासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास पत्नीनं दिला नकार, पतीनं घेतला विचित्र निर्णय

हाजीचं संपूर्ण कुटुंब दुबई आहे. तो स्वत: पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISIच्या सहकार्याने भारतविरोधी कारवायांमध्ये गुंतला होता. हाजीला राजौरी आणि पूंछच्या सर्व मार्गांची भौगोलिक परिस्थिती चांगली माहिती होती, म्हणूनच तो पाक सैन्याचा प्रमुख मार्गदर्शक मानला जात असे. हाजी कालच्या चकमकीत मारला गेला हे सुरक्षा दलाचं मोठं यश आहे.

First published:

Tags: Pakistan, Terrorist attack