नवी दिल्ली, 04 ऑक्टोबर : देशात कोरोना व्हायरसने (Coronavirus) मुळे लॉकडाउन लागू होता. त्यामुळे अनलॉकची घोषणा करत बऱ्याच अटी शिथिल करण्यात आल्यात. विमान सेवाही सुरू करण्यात आली आहे. विमानातून येणाऱ्या प्रवाशांच्या हातांवर क्वारंटाइनचा शिक्का मारले जात आहे. पण, यामुळे हातावर इजा होत असल्याचे समोर आले आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव आणि माजी खासदार मधू गौड याक्षी (Madhu goud yakshi) यांनी रविवारी ट्वीट करून आपल्या हातावर शिक्का मारल्यामुळे कसा परिणाम झाला याचा फोटो शेअर केला आहे. मधू याक्षी यांच्या हातावर मारण्यात आलेल्या शिक्का मारल्यामुळे रिअॅक्शन झाले आहे.
Dear @HardeepSPuri Ji, can you please look into the chemical being used at Delhi airport for stamping on passengers coming from abroad? Yesterday I was stamped at @DelhiAirport and this is how my hands look now. pic.twitter.com/Gt1tZvGc8L
मधू याक्षी यांनी याबद्दल केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांना ट्वीटरवर टॅग करून तक्रार केली आहे. 'प्रिय हरदीप सिंह पुरी जी, परदेशातून भारतात आल्यावर विमानतळावर होम क्वारंटाउन होण्यासाठी हातावर शिक्का मारला जात आहे. पण, त्याच्या केमिकलकडे लक्ष द्या, माझ्या हातावर दिल्ली विमानतळावर शिक्का मारण्यात आला होता, पण हातावर त्याचे रिअॅक्शन झाले आहे'
मधू याक्षी यांनी तक्रार केल्यानंतर केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सुद्धा ट्वीटरवरच त्यांना उत्तर दिले आहे. आपण ही बाब माझ्या लक्षात आणून दिली, त्याबद्दल आपला आभारी आहे. याबद्दल विमानतळ अथॉरिटी ऑफ इंडियाच्या सीएमडीसोबत चर्चा करणार आहे, असं आश्वासन हरदीप पुरी यांनी दिले.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रवाशांना होम क्वारंटाइन होण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांची ओळख व्हावी या हेतूने त्यांच्या हातावर होम क्वारंटाउनचा शिक्के मारले जात आहे. देशात विमान सेवा सुरू झाली आहे. त्यामुळे प्रत्येक विमानतळावर येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांच्या हातावर होम क्वारंटाइनचा शिक्का मारला जात आहे. निळ्या रंगाचा क्वारंटाइनचा शिक्का मारला जात आहे. त्यामुळे प्रवासी पुढील काही दिवस क्वारंटाइन राहतील आणि जर ते घरातून बाहेर पडले तर लगेच नियमांचे उल्लंघन केल्याचे लक्षात येईल.
राज्यात याआधीही मार्च महिन्यात जेव्हा लोकांना क्वारंटाइन करण्यासाठी हातावर शिक्के मारण्यात आले होते. तेव्हा हातावर रिअॅक्शन झाल्याचे समोर आले होते. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना या प्रकाराचा सामना करावा लागला होता. पण ही बाबसमोर आल्यानंतर शिक्का मारणे बंद करण्यात आले होते.