इमरती देवी म्हणाल्या, कधी काळी कमलनाथ यांना मी मोठा भाऊ मानत होती. मात्र मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी माझा अपमान केला होता. ते मुख्यमंत्री असताना आम्ही भेटायला गेल्यानंतर ते सगळ्यांना फटकारत असतं. त्यांनी मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत काहीही विकास केला नाही. मुख्यमंत्री पद गेल्याने कमलनाथ यांना वेड लागलं असून ते राज्यभर फिरत आहेत अशी बोचरी टीकाही त्यांनी केली. काय म्हणाले कमलनाथ? अखेर एका सभेदरम्यान कमलनाथ यांनी सोमवारी त्या वक्तव्यावरुन स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले की, मी कोणाचा अपमान केला नाही. ते पुढे म्हणाले की, मी नाव विसरलो होतो. मात्र शिवराज सिंह चौहान निमित्त शोधत आहे. पण कमलनाथ कधी कोणाचा अपमान करीत नाही. 'मुख्यमंत्र्यांनी थिल्लरपणा करू नये', देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात कमलनाथ यांनी एका निवडणूक सभेत म्हणाले की, मी जे काही म्हणालो, तो अपमान नव्हता. मी असं काही ठरवून म्हणालो नव्हतो..मला त्या व्यक्तीचं नाव लक्षात येत नव्हतं. ज्याचं नावच लक्षात नाही त्यांना काय म्हणू मी...आज ज्याप्रमाणे आपल्या व्यासपीठावर आयटम नंबर 1 आहेत राजनारायण सिंह, आयटन नंबर 2 अजय सिंहजी...या यादीत आयटन नंबर 1, आयटम नंबर 2..आयटम नंबर 3 असं नावं आहेत. मात्र शिवराज सिंह तर कारण शोधत आहेत असं म्हणत त्यांनी सावरासावर करण्याचा प्रयत्न केला.#WATCH Kamal Nath ji is from my party but personally, I don't like the type of language that he used...I don't appreciate it, regardless of who he is. It is unfortunate: Congress leader Rahul Gandhi on the former Madhya Pradesh CM's "item" remark pic.twitter.com/VT149EjHu0
— ANI (@ANI) October 20, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rahul gandhi