Home /News /national /

Breaking: माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीची आत्महत्या, घरी आढळून आला डॉ. सौंदर्याचा मृतदेह

Breaking: माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीची आत्महत्या, घरी आढळून आला डॉ. सौंदर्याचा मृतदेह

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री (Former Karnataka CM) बी. एस. येडियुरप्पा ( BS Yediyurappa) यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

    बंगळुरु, 28 जानेवारी:   कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री (Former Karnataka CM) बी. एस. येडियुरप्पा ( BS Yediyurappa)  यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. येडियुरप्पा यांच्या नातीनं आत्महत्या केली आहे. डॉ सौंदर्या ही येडियुरप्पा यांची लहान मुलगी पद्मा यांची मुलगी आहे. प्राथमिक अहवालानुसार ती बेंगळुरू (Bengaluru) येथील तिच्या घरी मृतावस्थेत आढळून आली. ती डिप्रेशनमध्ये अशी माहिती समोर आली आहे.  बेंगळुरूच्या एम एस रामिया हॉस्पिटलमध्ये ती डॉक्टर होती. घरातील मदतनीस नीरजला सकाळी 10 च्या सुमारास सौंदर्याने खोलीचा दरवाजा न उघडल्याची माहिती दिली. त्यानंतर संपूर्ण घटना उघडकीस आली. Soundarya, in her early 30s, was a doctor at MS Ramaiah hospital in Bengaluru. (News18) सौंदर्या, तिच्या वयाच्या 30 व्या वर्षी, बेंगळुरूच्या एमएस रमैया हॉस्पिटलमध्ये डॉक्टर होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ती पती, सहकारी डॉक्टर आणि 9 महिन्यांच्या मुलासोबत माउंट कार्मेल कॉलेजजवळील एका उच्चभ्रू अपार्टमेंटमध्ये राहत होती. तीन वर्षांपूर्वी तिचे लग्न झालं होतं. शुक्रवारी सकाळी सौंदर्याचा मृत अवस्थेत आढळून आला आणि मृत्यूचे कारण शोधण्यासाठी मृतदेह आता शवविच्छेदनासाठी सरकारी बोअरिंग रुग्णालयात हलवण्यात आला आहे. सौंदर्याची थोडक्यात ओळख सौंदर्या ही पद्मा (BSY ची सर्वात लहान मुलगी) यांची मुलगी आहे. सेंट्रल बेंगळुरूच्या वसंत नगरमधील एका उच्चभ्रू अपार्टमेंटमध्ये राहत होती. डॉक्टर नीरज यांच्याशी तिचं 3 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. ती स्वतः डॉक्टर होती.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Karnataka, Suicide

    पुढील बातम्या