मराठी बातम्या /बातम्या /देश /कपिल देव यांनी घेतली प्रियांका गांधींची भेट? राजकीय चर्चांना उधाण

कपिल देव यांनी घेतली प्रियांका गांधींची भेट? राजकीय चर्चांना उधाण

गेल्या काही दिवसांपासून अनेक सेलिब्रेटी राजकारणात उतरत असल्याचं चित्र आहे.

गेल्या काही दिवसांपासून अनेक सेलिब्रेटी राजकारणात उतरत असल्याचं चित्र आहे.

गेल्या काही दिवसांपासून अनेक सेलिब्रेटी राजकारणात उतरत असल्याचं चित्र आहे.

    नवी दिल्ली, 17 मार्च : भारताचे माजी क्रिकेटर कपिल देव यांनी काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांची भेट घेतली, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

    गेल्या काही दिवसांपासून अनेक सेलिब्रेटी राजकारणात उतरत असल्याचं चित्र आहे. अशातच आता 1983 साली भारताला विश्वचषक मिळवून देण्यासाठी मोठं योगदान देणारे माजी कर्णधार कपिल देव यांनी दिल्ली इथं प्रियांका गांधी यांची भेट घेतली असल्याची माहिती आहे. या भेटीत राजकीय चर्चा झाली की नाही, याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

    दरम्यान, क्रिकेटचं मैदान गाजवणारा गौतम गंभीरदेखील आता राजकारणाच्या आखाड्यात आपलं नशीब आजमावणार असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. टीम इंडियाचा माजी क्रिकेटर गौतम गंभीर लोकसभा निवडणूक लढणार असल्याची जोरदार चर्चा आहे. भाजपकडून नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून गौतम गंभीरला निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात येणार असल्याचे म्हटलं जात आहे.

    सध्या मीनाक्षी लेखी या मतदारसंघातील खासदार आहेत. पण या मतदार संघातून आता गौतम गंभीरला संधी मिळणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे भाजपकडून मीनाक्षी लेखींना अन्य जागेची उमेदवारी देण्याची शक्यता आहे. पण अद्याप या चर्चांना अधिकृतरित्या दुजोरा मिळालेला नाही.

    2014मधील लोकसभा निवडणुकीत मीनाक्षी लेखी यांना 4,53,350(46.75 टक्के)मतं मिळाली होती. या जागेवर दुसऱ्या क्रमांकावर प्रतिस्पर्धी आम आदमी पक्षाचे उमेदवार आशीष खेतान यांना 2,90,642 (29.97 टक्के) मतं मिळाली होती. तर काँग्रेसचे अजय माकन हे तिसऱ्या क्रमांकावर होते. दुसरीकडे या जागेवर काँग्रेसचा सात वेळा विजय झाला आहे. जनसंघचे नेते बलराज मधोक हे देखील याच जागेवर एकदा निवडून आले होते. विशेष म्हणजे 1977मधील निवडणुकीत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी तसंच 1989 आणि 1991 मध्ये लालकृष्ण आडवाणी यांनी याच जागेवरून विजय मिळवला होता. तर, 1992मध्ये झालेल्या पोट निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार राजेश खन्ना यांनी भाजपचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा धूळ चारली होती.

    VIDEO : मोदींच्या फोटोशूटवर राहुल गांधींची टीका

    First published:
    top videos

      Tags: Delhi, Kapil dev, Priyanka gandhi