काँग्रेसला आणखी एक दणका? माजी क्रिकेटपटू सोडणार पक्षाचा हात

काँग्रेसला आणखी एक दणका? माजी क्रिकेटपटू सोडणार पक्षाचा हात

मोहम्मद अजहरुद्दीन लवकरच काँग्रेस पक्षाला रामराम करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

  • Share this:

हैदराबाद, 29 सप्टेंबर: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि हैदराबाद क्रिकेट संघाचा नवनिर्वाचित अध्यक्ष मोहम्मद अजहरुद्दीन लवकरच काँग्रेस पक्षाला रामराम करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अजहरुद्दीन तेलंगणा राष्ट्र समिती पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. अजहरने TRSचे कार्यकारी अध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री बुद्ध भवन यांची भेट घेतली. याशिवाय अजहरने पक्षाचे अन्य सदस्यांची भेट घेतली आहे. अजहरच्या या भेटींमुळे काँग्रेसचा हा माजी खासदार आता पक्षाचा हात सोडून TRSमध्ये जाणार असल्याचे बोलले जात आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अजहर आणि भवन तसेच अन्य सदस्यांची भेट ही केवळ शुभेच्छा भेट होती. पण राज्याच्या राजकारणात मात्र या भेटींचा वेगळा अर्थ काढला जात आहे. विशेष म्हणजे शुक्रवारीस अजहरुद्दीनची हैदराबाद क्रिकेट संघाच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. या निवडीनंतर मीडियाशी बोलताना अजहरने देखील सांगितले होते की, माझ्या TRSमध्ये सहभागी होण्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. पण या सर्व अफवा आहेत.क्रिकेटच्या प्रमोशनसाठी राज्य सरकारची मदत लागणार आहे. यासंदर्भात मी मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांची देखील भेट घेणार असल्याचे अजहरने सांगितले.

अर्थात अजहरने TRSमध्ये जाणार नसल्याचे सांगितले असले तरी त्याचे समर्थक मात्र या वृत्ताला दुजोरा देत आहेत. गेल्या 10 वर्षापासून अजहर काँग्रेसमध्ये आहे. 2009च्या लोकसभा निवडणुकीत त्याने उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. तेव्हा अजहरने भाजपचे कुंवर सर्वेस कुमार सिंह यांचा 50 हजार मतांनी पराभव केला होता. त्यानंतर 2014च्या निवडणुकीत काँग्रेसने त्याला उत्तर प्रदेश ऐवजी राजस्थानमधील टोक सवाई माधोपूर या मतदारसंघातून उमेदवारी दिली. पण तेव्हा त्याचा पराभव जाला. 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी अजहरची तेलंगणा प्रदेश काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आली होती.

काश्मीरमधील ओसामा ठार; महिला कमांडरने केली कारवाई, ऑपरेशनचा VIDEO समोर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Congress
First Published: Sep 29, 2019 11:33 AM IST

ताज्या बातम्या