Home /News /national /

BREAKING : माजी भारतीय क्रिकेटपटूचा कोरोनामुळे मृत्यू

BREAKING : माजी भारतीय क्रिकेटपटूचा कोरोनामुळे मृत्यू

त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं, त्यात किडनीचा त्रास सुरू झाल्याने त्यांचा आज मृत्यू झाला

    नई दिल्‍ली, 16 ऑगस्ट : माजी भारतीय क्रिकेटर चेतन चौहान यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. काही दिवसांपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. गेल्या महिन्यांना त्यांना कोरोनाची लागण झाली होती, त्यानंतर त्यांना लखनऊ येथे दाखल करण्यात आले होते. ते कोरोनाशी लढा देत होते..अशातच त्यांना किडनी आणि ब्लड प्रेशरचा त्रास सुरू झाला. ज्यानंतर त्यांना शुक्रवारी रात्री व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्यातच आज त्यांच्या मृत्यूची बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेश सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री चौहान यांची 12 जुलै रोजी कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांना लखनऊ येथे संजय गांधी पीजीआय रुग्णालयात भर्ती करण्यात आलं होतं. त्यानंतर काही दिवसांनी त्यांना गुरुग्राम मेंदाता रुग्णालयात हलविण्यात आले. काल आलेल्या बातमीनुसार त्यांनी किडनी काम करणं बंद झाली होती. त्यानंतर त्यांच्या शरीरातील अवयव निकामी होत गेले. कोरोनाची लागण झाल्यामुळे योगी सरकारमधील दुसऱ्या कॅबिनेट मंत्र्याचं निधन झालं आहे. यापूर्वी 2 ऑगस्ट रोजी कमला रानी वरुन याचंही निधन झालं होतं. त्यानंतर आता चेतन चौहान याच्या निधनाची बातमी समोर आली आहे. चेतन चौहान बराच काळ सुनील गावसकर यांच्यासह ओपनिंग बॅट्समॅन होते. टेस्ट क्रिकेटमध्ये दोघांनी मिळून 3000 रन केले होते. दोघांमध्ये 1979 मध्ये ओव्हलमध्ये झालेल्या पार्टनरशीप लोकांच्या आजही आठवणीत आहेत. या जोडीने मिळून 213 धावा करुन त्यावेळी 203 धावांची सर्वाधिक काळाच्या पार्टनरशीपचा रेकॉर्ड तोडला होता. 73 वर्षीय चेतन यांनी 1969 मध्ये टेस्ट क्रिकेटरसह इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये डेब्यू केला होता आणि 1978 मध्ये त्यांनी वनडे क्रिकेटमध्ये डेब्यू केला होता. भारताकडून त्यांनी 40 टेस्ट आणि 7 वनडे मॅच खेळले होते. टेस्ट क्रिकेटमध्ये 2000 हून अधिक धावा करुनही चेतन चौहान यांच्या नावावर एकही शतक होऊ शकला नाही.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Cricket

    पुढील बातम्या