• Home
  • »
  • News
  • »
  • national
  • »
  • ...आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी दिल्ली मेट्रो गाठली, शासकीय गाडी सुद्धा टाळली!

...आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी दिल्ली मेट्रो गाठली, शासकीय गाडी सुद्धा टाळली!

या प्रकरणाची कुठलीही माहिती प्रसारमाध्यमामध्ये उलगडल्या जाऊ नये, याची काळजी अनिल देशमुख घेत होते.

  • Share this:
नवी दिल्ली, 06 एप्रिल : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir singh) यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना गृहमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले. दिल्लीत (Delhi) पोहोचल्यानंतर अनिल देशमुख  मात्र दोन दिवसांच्या दौर्‍यामध्ये ते सतत लपत-छपत फिरत असल्याचे पहावयास मिळाले. त्यामुळे अनिल देशमुख यांना लपत-छपत का फिरावे लागत आहे असा एक मोठा प्रश्न उपस्थित झाला. अनिल देशमुख गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राजधानी दिल्लीत मुंबईवरून येणार होते. त्यामुळे देशभरातील मीडिया हा इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर वाट पाहत असताना ते दुसऱ्या गेट मधून निघून गेले. प्रसार माध्यमांची त्यांच्यावर नजर पडू नये म्हणून त्यांनी आपली सरकारी गाडी देखील एका मेट्रो स्टेशनवर बोलविली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. OMG! अमृता फडणवीस यांना चक्क वय जास्त असावं वाटतंय; पाहा काय म्हणतायत अनिल देशमुख हे मेट्रोने प्रवास करून  डौला कुवा या मेट्रो स्टेशनला पोहोचले आणि तिथून त्यांनी सरकारी गाडी घेतली. तोपर्यंत त्यांचा राजीनामा मंजूर झाला नव्हता मात्र जेव्हा ते अभिषेक मनु सिंघवी यांच्या निवासस्थानी पोहोचले, तोपर्यंत राज्यपालांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला होता. त्यानंतर त्यांनी आपली सरकारी गाडी सोडल्याची माहिती पुढे आली आहे. राज्यात 3 दिवस इतकाच लसीकरणाचा साठा, राजेश टोपेंनी केंद्राकडे मागितली मदत महाराष्ट्र सरकारच्या वतीने यापूर्वी अनेकदा अभिषेक मनु सिंघवी यांनी सुप्रीम कोर्टात बाजू मांडली आहे. त्यामुळे त्यांचा सल्ला घेण्याकरता तात्काळ अनिल देशमुख दिल्ली आले होते. जवळपास एक तास अनिल देशमुख आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी चर्चेमध्ये वेळ घालवला. त्यानंतर रात्री उशिरा ते ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांच्या निवासस्थानी पोहोचले, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. रात्री उशिरापर्यंत अनिल देशमुख यांच्या प्रकरणात राजधानी दिल्लीमध्ये बैठकांचे सत्र सुरू होते. मात्र, अनिल देशमुख यांना फक्त अभिषेक मनु सिंघवी यांच्याच निवासस्थानी प्रसिद्धी माध्यमांचे प्रतिनिधी गाठू शकले. कोर्टामध्ये याचिका दाखल करताना देखील अनिल देशमुख यांनी अतिशय गुप्तता बाळगली. महाराष्ट्र सरकारचे वकील राहुल चिटणीस यांच्यासोबत ते बैठक करीत होते. मात्र, याचा थांगपत्ता हा प्रसार माध्यमांना लागू नये, याची सर्व काळजी अनिल देशमुख घेत होते. महत्त्वाचं म्हणजे, ते दिवसभर राजधानी दिल्लीत होते, त्यांनी महाराष्ट्र सदनामध्ये दोन सदनिका देखील आरक्षित केल्या होत्या. IPL मध्ये सर्वाधिक विकेट घेणारे टॉप-5 बॉलर, 3 जण खेळले मुंबईकडून मात्र, ते दोन्ही महाराष्ट्र सदनात रात्री थांबले नाही. एका गुप्त ठिकाणी अनिल देशमुख थांबले होते आणि तेथूनच महाराष्ट्र सरकारच्या वतीने याचिका दाखल करताना आपली ही याचिका कशी दाखल होईल याचा प्रयत्न करत होते. सोबतच राज्य सरकारच्या प्रतिनिधीसोबत ते दिल्लीत आले होते. मात्र, या प्रकरणाची कुठलीही माहिती प्रसारमाध्यमामध्ये उलगडल्या जाऊ नये, याची काळजी अनिल देशमुख घेत होते.
Published by:sachin Salve
First published: