पाकिस्तानच्या आणखी एका अधिकाऱ्याने दिली भारताला युद्धाची धमकी

पाकिस्तानच्या आणखी एका अधिकाऱ्याने दिली भारताला युद्धाची धमकी

पहिला पर्याय म्हणजे नॅशनल कॉन्फरन्सने सुप्रीम कोर्टात लढाई लढावी, दुसरा पर्याय म्हणजे पाकिस्तानने राजकीय मुत्सद्देगिरीच्या जोरावर विषय मांडावा, भारतावर आंतरराष्ट्रीय दबाव वाढवावा आणि हे सगळं यशस्वी झालं नाही तर...

  • Share this:

इस्लामाबाद 11 ऑगस्ट :  केंद्र सरकारने कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तानात खळबळ माजलीय. ताळतंत्र सोडलेले पाकिस्तानी नेते आणि अधिकारी भारताला वारंवार युद्धाच्या धमक्या देत आहेत. काही नेत्यांनंतर आता पाकिस्तानचे भारतातले माजी उच्चायुक्त अब्‍दुल बासित यांनी भारताला युद्धाची धमकी दिलीय. भारताने हद्द पार केली तर पाकिस्तानला युद्धाशीवाय पर्याय नाही अशी वल्गनाही बासित यांनी केलीय. या आधी पंतप्रधान इम्रान खान यांनीही संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधीत करताना धमकावण्याचा प्रयत्न केला होता.

बासित म्हणाले, पहिला पर्याय म्हणजे नॅशनल कॉन्फरन्सने सुप्रीम कोर्टात लढाई लढावी, दुसरा पर्याय म्हणजे पाकिस्तानने राजकीय मुत्सद्देगिरीच्या जोरावर विषय मांडावा, भारतावर आंतरराष्ट्रीय दबाव वाढवावा आणि हे सगळं यशस्वी झालं नाही तर युद्ध करण्यास मागेपुढे पाहू नये.

लडाखच्या सीमेजवळ पाकिस्तानची लढाऊ विमानं, आगळीक केली तर खबरदार!

केंद्र सरकारने कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तानात खळबळ माजलीय. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला एकाही देशाने पाठिंबा दिला नाही. त्यानंतर पाकिस्तान आता लडाख सीमेजवळ लढाऊ विमाने तैनात करत असल्याची माहिती पुढे आलीय. भारतीय सुरक्षा संस्था आणि गुप्तचर यंत्रणांची पाकिस्तानच्या हालचालींवर करडी नजर असून लष्कर आणि हवाई दलाला अलर्ट करण्यात आल्याची माहितीही सूत्रांनी दिलीय.

जम्मू काश्मीर मुस्लिम बहुल असल्यानेच '370' हटवलं, काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी तर पाक संसदेच्या संयुक्त सत्रात बोलताना सरळसरळ युद्धाची धमकीच दिली होती. त्यानंतर  लडाख सीमेजवळच्या स्कर्दू भागात Pakistan Air force पाकिस्तान जमवाजमव करत असल्याचं वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं आहे. तर काही दिवसांपूर्वी पाकिस्तानातले पत्रकार हमीद मीर यांनीही एक ट्विट करत पाकिस्तानी सैन्य सीमेजवळ साधन सामुग्री पोहोचवित असल्याचं म्हटलं होतं.

First published: August 12, 2019, 9:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading