Elec-widget

माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते अरुण जेटली यांचे निधन

माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते अरुण जेटली यांचे निधन

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे आज दिल्लीतील AIIMS रुग्णालयात निधन झाले.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 ऑगस्ट: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे आज दिल्लीतील AIIMS रुग्णालयात निधन झाले. ते 66 वर्षाचे होते. जेटली यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने AIIMSमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय मंत्री हर्षवर्धन AIIMSमध्ये जाऊन प्रकृतीची विचारपूस केली होती. 6 ऑगस्टला भाजपच्या नेत्या आणि माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांचे निधन झाले होते. त्यानंतर आता जेटली यांच्या निधनामुळे भाजपचे मोठे नुकसान झाले आहे. या दोन्ही नेत्यांनी मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात महत्त्वाची कामगिरी पार पाडली होती.

गेल्या काही वर्षांपासून जेटली यांच्या प्रकृतीत चढ उतार होत होते. 14 मे 2018 रोजी त्यांच्यावर किडनी ट्रान्सप्लंटची शस्त्रक्रिया झाली होती. तेव्हा ते जवळ जवळ 100 दिवस अर्थ मंत्रालयात आले नव्हते. या काळात पियुष गोयल यांच्याकडे अर्थ मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता. सप्टेंबर 2014मध्ये बॅरिएट्रिक ऑपरेशन करण्यात आले होते. मधुमेहामुळे त्यांचे वजन वाढत होते आणि त्यामुळेच जेटली यांचे ऑपरेशन करण्यात आले होते. तेव्हा प्रथम मॅक्स रुग्णालयात नंतर AIIMSमध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते. तर त्याआधी त्यांच्या हृदयाचे ऑपरेशन झाले होते.

मे महिन्यात लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर जेटली यांनी पंतप्रधान मोदींनी पत्र लिहून मंत्रिपदासाठी आपला विचार करू नये अशी विनंती केली होती. या पत्रात त्यांनी गेल्या 18 महिन्यांपासून प्रकृती खराब असल्याचे म्हटले होते. प्रकृती ठिक नसल्यामुळे आपण जबाबदारी पार पाडू शकत नाही. त्यामुळेच मंत्रिमंडळात आपला विचार करू नये असे त्यांनी म्हटले होते.

CA,वकील आणि राजकारणी

Loading...

जेटली यांची ओळख राजकारणी अशी असली तरी त्यांनी CA व्हायचे होते.पण ते होऊ शकले नाहीत. त्यानंतर वकीलीचे शिक्षण पूर्ण करून जेटली यांनी 1987पासून सर्वोच्च न्यायालयात आणि अनेक उच्च न्यायालयात वकिली सुरु केली. 1990मध्ये दिल्ली उच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील अशी त्यांची ओळख तयार झाली होती. 1991पासून त्यांनी सक्रीय राजकारणात प्रवेश केला. 1999च्या लोकसभा निवडणुकीत ते पक्षाचे मुख्य प्रवक्ते होते. वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात जेटली यांच्याकडे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा कार्यभार होता. त्याच बरोबर ते निर्गुंतवणूक मंत्रालयाचे देखील मंत्री होते. वाजयेपी यांच्या मंत्रिमंडळातून राम जेठमलानी यांनी राजीनामा दिल्यानंतर जेटलींकडे कायदा आणि न्याय तसेच कंपनी व्यवहार या मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. 2004 ते 2014 याकाळात ते राज्यसभेतील विरोधी पक्षनेते होते.

VIDEO: भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली; दुर्घटनेची भीषण दृश्यं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 24, 2019 12:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...