मराठी बातम्या /बातम्या /देश /

काँग्रेसच्या नेत्या शीला दीक्षित यांचं निधन

काँग्रेसच्या नेत्या शीला दीक्षित यांचं निधन

शीला दीक्षित यांचा जन्म 31 मार्च 1938 साली पंजाबमधल्या कापुरतळामध्ये झाला. त्यांचं मूळचं नाव शीला कपूर होतं.

शीला दीक्षित यांचा जन्म 31 मार्च 1938 साली पंजाबमधल्या कापुरतळामध्ये झाला. त्यांचं मूळचं नाव शीला कपूर होतं.

शीला दीक्षित 81 वर्षांच्या होत्या. दिल्लीचं दीर्घकाळ मुख्यमंत्रिपद त्यांनी भुषवलं होतं.

    नवी दिल्ली 20 जुलै : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं आज निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. त्या 81 वर्षांच्या होत्या. दिल्लीचं दीर्घकाळ मुख्यमंत्रिपद त्यांनी भुषवलं होतं. ह्रदयविकाराच्या धक्क्याने त्यांचं निधन झालं. दिल्लीतल्या एक्सकॉर्ट हॉस्पिटलमध्ये त्यांचं निधन झालं. त्यांनी 1998 ते 2013 पर्यंत असं 15 वर्ष दिल्लीचं मुख्यमंत्रिपद भुषवलं होतं. त्यानंतर त्यांची केरळच्या राज्यपालपदीही नियुक्ती करण्यात आली होती. शेवटच्या काळापर्यंत त्या कार्यरत होत्या. पंजाबमधल्या कपूरथळा इथं 31 मार्च 1938 ला त्यांचा जन्म झाला. काँग्रेसला जनाधार मिळवून देणाऱ्या नेत्यांमध्ये त्यांची गणना केली जात होती. दिल्लीतील कॉन्व्हेंट ऑफ जीझस अँड मेरी स्कूलमध्ये त्यांचं शालेय शिक्षण झालं. दिल्ली विद्यापीठाच्या मिरांडा हाऊस महाविद्यालयातून त्यांना एम.ए.ची पदवी घेतली. १९८४ ते १९८९ या कालावधीत त्यांनी लोकसभेत उत्तर प्रदेशच्या कन्नौजचं प्रतिनिधीत्व केलं. त्यानंतर पुढे त्या दिल्लीचा चेहरा झाल्या. लोकसभा निवडणुकीच्या आधी शीला दीक्षित यांच्याकडे दिल्लीच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती.  उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत त्यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून घोषीत करण्यात आलं होतं. मात्र  नंतर काँग्रेसने समाजवादी पक्षाशी आघाडी केली. नंतर त्या पुन्हा दिल्लीत सक्रीय झाल्या. दिल्लीच्या विकासात त्यांचं योगदान होतं. १९९८ सालापासून तीन वेळा त्या दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदावर निवडून आल्या व त्यांनी एकूण १५ वर्षे मुख्यमंत्रीपद सांभाळलं.  परंतु २०१३ दिल्ली विधानसभा निवडणूकीमध्ये आम आदमी पार्टीच्या अरविंद केजरीवालनी दीक्षित ह्यांना नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघामध्ये पराभूत केले. ह्याआधी इ.स. १९८४ सालातील लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश राज्यातील कनोज लोकसभा मतदारसंघातून त्या लोकसभेवर निवडून गेल्या. दिल्लीच्या मुख्यमंत्री असताना कॉमनवेल्थ खेळाच्या आयोजनात झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी त्यांच्यावर आरोपही झाले होते. गांघी घराण्याच्या त्या विश्वासू होत्या. केंद्रीय मंत्री म्हणूनही त्यांची कारकिर्दी गाजली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी दीक्षित यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केलंय.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Congress leader, Sheila Dikshit, शीला दीक्षित

    पुढील बातम्या