मराठी बातम्या /बातम्या /देश /

BREAKING: माजी क्रिकेटर मोहम्मद अजहरुद्दीन यांच्या गाडीला भीषण अपघात, थोडक्यात बचावले कुटुंब

BREAKING: माजी क्रिकेटर मोहम्मद अजहरुद्दीन यांच्या गाडीला भीषण अपघात, थोडक्यात बचावले कुटुंब

  नव वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी अजहरुद्दीन आपल्या कुटुंबीयांसोबत माधोपूर येथील रणथंबौर इथं आले होते.

नव वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी अजहरुद्दीन आपल्या कुटुंबीयांसोबत माधोपूर येथील रणथंबौर इथं आले होते.

नव वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी अजहरुद्दीन आपल्या कुटुंबीयांसोबत माधोपूर येथील रणथंबौर इथं आले होते.

  • Published by:  sachin Salve

राजस्थान, 30 डिसेंबर : भारतीय टीमचे माजी क्रिकेटर मोहम्मद अजहरुद्दीन (mohammad azharuddin car accident ) यांच्या गाडीला राजस्थानमधील (rajasthan) सवाई माधोपूर जिल्ह्यात भीषण अपघात झाला. भरधाव गाडीत थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या ढाब्यात शिरली. सुदैवाने या अपघातातून मोहम्मद अजहरुद्दीन थोडक्यात बचावले आहे.

मोहम्मद अजहरुद्दीन आपल्या कुटुंबीयांसोबत हुंदई एसयुव्हीने चालले होते. अजहरुद्दीन आपल्या कुटुंबीयांसोबत रणथंभौर भवन इथं जात होते. फूल मोहम्मद चौकात पोहोचल्यानंतर अचानक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव कार ही  महामार्गाच्या बाजूला असलेल्या ढाब्यात शिरली. या दुर्घटनेत एक तरुण जखमी झाला आहे.

ICC World Test Championship: भारताच्या विजयामुळे ऑस्ट्रेलियाला धक्का

चौकात आल्यानंतर गाडी पलटी झाली होती. त्यावेळी धाब्यात  उभा असलेला तरुण गाडीखाली सापडला. हा तरुण धाब्यातच काम करत होता.  यात तरुणाला दुखापत झाली असून त्याला तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हा अपघात इतका भीषण होता की,  भरधाव एसयुव्ही कार उलटली आणि धाब्यात जाऊन थांबली. यात धाब्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर गाडीचाही चुराडा झाला आहे. अजहरुद्दीन यांच्या गाडीचे चाक निकामी झाल्यामुळे हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे.

सुदैवाने या अपघातात अझहरुद्दीन यांच्या कुटुंबीयांना कोणतीही दुखापत झाली नाही. सर्वजण सुरक्षीत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

कोल्हापुरकरांचा नादच खुळा! क्रिकेट स्पर्धेचं बक्षीस ऐकून तुम्हालाही बसेल धक्का..

अपघातानंतर  मोहम्मद अजहरुद्दीन यांचे कुटुंबीय रणथंभौर येथील हॉटेलमध्ये पोहोचले आहे. नव वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी अजहरुद्दीन आपल्या कुटुंबीयांसोबत माधोपूर येथील रणथंबौर इथं आले होते. त्या दरम्यानही घटना घडली. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून अधिक तपास करत आहे.

First published: