S M L

माजी मुख्यमंत्र्यांना आलिशान बंगले मिळणार नाहीत- सुप्रीम कोर्ट

माजी मुख्यमंत्र्यांना सरकारी बंगले मिळणार नाहीत, असा महत्त्वाचा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिलाय. यामुळे प्रामुख्यानं उत्तरेतल्या माजी मुख्यमंत्र्यांना फटका बसणार आहे.

Sonali Deshpande | Updated On: May 7, 2018 12:13 PM IST

माजी मुख्यमंत्र्यांना आलिशान बंगले मिळणार नाहीत- सुप्रीम कोर्ट

उत्तर प्रदेश, 07 मे : माजी मुख्यमंत्र्यांना सरकारी बंगले मिळणार नाहीत, असा महत्त्वाचा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिलाय. यामुळे प्रामुख्यानं उत्तरेतल्या माजी मुख्यमंत्र्यांना फटका बसणार आहे. अखिलेश, मायावती, मुलायम सिंग यांना आता बंगले सोडावे लागतील.

उत्तर प्रदेश सरकारनं काही महिन्यांपूर्वी एक कायदा मंजूर केला होता, ज्यामुळे माजी मुख्यमंत्र्यांना आलिशान सरकारी बंगले मिळणं शक्य झालं होतं. पण त्याविरोधात लोक प्रहारी नावाच्या एनजीओनं याचिका दाखल केली. या याचिकेवर कोर्टानं निर्णय दिला. न्यायमूर्ती रंजन गोगोई आणि न्यायमूर्ती आर. भानुमती यांनी हा निर्णय दिला.

महाराष्ट्रात तरी माजी मुख्यमंत्र्यांना सरकारी बंगले दिले गेल्याचं ऐकीवात नाहीये. पद सोडल्यावर सगळे समान असतात, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय.

काय म्हणालं सुप्रीम कोर्ट?

हा कायदा घटनाबाह्य आहे. अशा कायद्यांनी एक वेगळा स्तर निर्माण होतो. जनतेच्या सेवकानं एकदा पद सोडलं की सामान्यांपासून त्याला वेगळं ठरवणाऱ्या गोष्टी अस्तित्वात असता कामा नयेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 7, 2018 12:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close