Home /News /national /

माजी प्रशासकीय अधिकाऱ्यांचं पंतप्रधानांना पत्र; संसद भवनाच्या नव्या इमारतीबद्दल म्हणाले...

माजी प्रशासकीय अधिकाऱ्यांचं पंतप्रधानांना पत्र; संसद भवनाच्या नव्या इमारतीबद्दल म्हणाले...

69 माजी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना एक अनावृत्त पत्र (Open letter to PM) लिहीलं आहे. नव्या संसद भवनाच्या उभरणीबद्दल हे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवलं आहे.

    नवी दिल्ली, 23 डिसेंबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी सेंट्रल व्हिस्टा डेव्हलपमेंट प्रकल्पाला माजी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी (Former Civil Servants) विरोध दर्शवला आहे. यापैकी 69 अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना एक अनावृत्त पत्र  (Open letter to PM) लिहिलं असून हा प्रकल्प आताच्या परिस्थिती राबवणं गरजेचं नाही असं मत त्यात व्यक्त केलं आहे. सेंट्रल व्हिस्टा डेव्हलपमेंट प्रकल्पाअंतर्गत भारतीय संसदेची नवी इमारत उभारली जाणार आहे, सरकारमध्ये या आधी काम केलेल्या या अधिकाऱ्यांना सरकारी खर्च त्यांचं नियोजन याची पूर्ण माहिती आहे त्यामुळे त्यांनी थेट या प्रकल्पाला विरोध केला आहे. काय लिहीलं आहे या पत्रात? सध्या कोविडच्या काळात देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. कोरोना महामारीशी लढत असलेल्या रुग्णांना पुरेशा वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात सरकार पुरे पडत नाही. अशी अनेक संकटं देशासमोर असताना केवळ भव्य इमारत उभारणी करतोय हे दाखवण्यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. सरकारकडून कार्यपालिकेचा गैरवापर केला जात आहे असं या अनावृत्त पत्रात म्हटलं आहे. नव्या बजेटमध्ये अधिक खर्च देशाच्या राजधानीत मध्यवर्ती ठिकाणी सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाअंतर्गत (Central Vista Development Project) संसदेची नवी वास्तू बांधली जाणार आहे. या इमारतीत केंद्रीय मंत्रालयांची नवी कार्यालयं, उपराष्ट्रपतींसाठी वेगळा एनक्लेव्ह आणि पंतप्रधानांचं नवं ऑफिस असेल. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित हा प्रकल्प होणार असून त्यासाठी आधी 11,794 कोटी रुपये खर्च येणार होता तो आता वाढवून 13, 450 कोटी रुपये करण्यात आला आहे या मुद्द्याकडेही या माजी अधिकाऱ्यांनी लक्ष वेधलं आहे. या अधिकाऱ्यांनी लिहीलं पंतप्रधानांना पत्र माजी आयएएस अधिकारी जवाहर सिरकर, जावेद उस्मानी, एन. सी. सक्सेना, अरुणा राय, हर्ष मंदर आणि राहुल खुल्लर यांच्याबरोबरच आयपीएस अधिकारी एस. दुलत, अमिताभ माथुर आणि जुलिओ रिबेरो यांनी या पत्रावर स्वाक्षरी केली आहे. 'सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्टबद्दल आमची नाराजी आम्ही आपल्याशी आणि आपल्या सरकारकडे व्यक्त करत आहोत. या आधीच कधीच कार्यपालिकेने एवढी मनमानी केली नव्हती तेवढी मनमानी या प्रकल्पात केली जात असल्याचं सुरुवातीपासूनच दिसून येत आहे, अशा कठोर शब्दांत या अधिकाऱ्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
    Published by:Amruta Abhyankar
    First published:

    Tags: Narendra modi, Parliament

    पुढील बातम्या