मराठी बातम्या /बातम्या /देश /

माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांची प्रकृती गंभीर, दिल्लीतील बैठक आटपून योगी आदित्यनाथ थेट हॉस्पिटलमध्ये

माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांची प्रकृती गंभीर, दिल्लीतील बैठक आटपून योगी आदित्यनाथ थेट हॉस्पिटलमध्ये

Kalyan Singh health Update: सध्या त्यांच्यावर पीजीआयमध्ये (Lucknow PGI)उपचार सुरु आहेत. यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM yogi) पुन्हा एकदा त्यांची विचारपूस करण्यासाठी PGI मध्ये दाखल झाले.

  • Published by:  Pooja Vichare

लखनऊ, 20 ऑगस्ट: उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh)माजी मुख्यमंत्री (Former Chief Minister) कल्याण सिंह (Kalyan Singh)यांची प्रकृती गंभीर आहे. सध्या त्यांच्यावर पीजीआयमध्ये (Lucknow PGI)उपचार सुरु आहेत. पीजीआयचे संचालक आर के धीमन यांचं म्हणणं आहे की, माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचं ब्लड प्रेशर सतत कमी होत आहे. ते यूरिन देखील पास करु शकत नाही आहेत. याच कारणानं त्यांचं डायलिसिस केलं जात आहे.

डॉक्टर त्याच्या प्रकृतीवर सतत नजर ठेवून आहेत. डॉक्टर आज संध्याकाळपर्यंत आणि उद्या त्याच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची वाट पाहत आहेत. सध्या ते फक्त व्हेंटिलेटरवर असल्याचं डॉक्टर प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

कल्याण सिंह यांची प्रकृती गंभीर असल्याची  माहिती मिळताच यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM yogi) पुन्हा एकदा त्यांची विचारपूस करण्यासाठी PGI मध्ये दाखल झाले. गुरुवारी मुख्यमंत्री योगी बैठकीसाठी दिल्लीला गेले होते. आज तिथून परत येताच त्यांनी सर्वप्रथम हॉस्पिटल गाठले. यावेळी त्यांनी डॉक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती घेतली. त्यासोबतच माजी मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबाचीही भेट घेतली.

कल्याण सिंह यांची प्रकृती गंभीर अस''दिपाली, तुझ्या पाठी यावं असं वाटतंय...'', महिला अधिकाऱ्याची Audio सुसाइड Clip

कल्याण सिंह यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा नाही

4 जुलैपासून माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह पीजीआय हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत.आयसीयूमध्ये चार दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांची प्रकृती सुधारली होती. पण नंतर त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली, तेव्हापासून त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झालेली नाही. त्यांची प्रकृती पहिल्यासारखीच आहे. 17 जुलैला अचानक त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तेव्हापासून ते सतत ऑक्सिजन सपोर्टवर आहेत.

First published:

Tags: Uttar pradesh, Yogi Aadityanath