कनवी दिल्ली 06 डिसेंबर : शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी (Wasim Rizvi) इस्लाम धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारणार आहेत. दसना देवी मंदिराचे महंत यती नरसिंहानंद गिरी महाराज त्यांचं धर्मपरिवर्तन करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रिझवी आज सकाळी 10.30 वाजता गाझियाबादमधील दसना देवी मंदिरात हिंदू धर्म स्वीकारणार आहेत (Wasim Rizvi will Accept Hindu Dharma). यती नरसिंहानंद गिरी महाराज त्यांना पूर्ण विधींसह हिंदू धर्मात विलीन करतील.
वसीम रिझवी यांनी काही दिवसांपूर्वीच मृत्यूपत्र जारी केले होते. त्यात त्यांनी मृत्यूनंतर मला दफन करू नये, तर हिंदू रितीरिवाजांनुसार माझ्यावर अंत्यसंस्कार करावेत, अशी घोषणा केली होती. यती नरसिंहानंद यांनी माझ्या चितेला अग्नी द्यावी असेही ते म्हणाले होते.
मला ठार मारण्याचा आणि शिरच्छेद करण्याचा कट रचला जात आहे, असा व्हिडिओ रिझवी यांनी जारी केला होता. माझा गुन्हा एवढाच आहे की मी कुराणातील 26 श्लोकांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले . मुस्लिमांना मला मारायचे आहे आणि त्यांनी मला कोणत्याही कब्रस्तानात जागा देणार नाही असे जाहीर केले आहे. त्यामुळे मी मेल्यानंतर माझ्यावर अंत्यसंस्कार करावेत, असं त्यांनी यात म्हटलं होतं.
कट्टरपंथी मुस्लीम अनेकदा वसीम रिझवी यांना लक्ष्य करतात. कुराणातील २६ श्लोक काढून टाकण्याची मागणी करणारी याचिका त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती, ती फेटाळण्यात आली होती. तेव्हापासून रिझवी मुस्लिम संघटनांच्या निशाण्यावर आहेत. रिझवी यांचा इस्लाम आणि शिया समाजाशी काहीही संबंध नसल्याचेही मुस्लीम संघटनांचे म्हणणे आहे. मुस्लिम संघटना रिझवी यांचे मुस्लिमविरोधी संघटनांचे एजंट म्हणून वर्णन करतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.