Home /News /national /

TRP घोटाळ्यातील मास्टरमाइंड BARC चे माजी CEO अटकेत; मुंबई क्राईम ब्रँचने पुण्यात केली कारवाई

TRP घोटाळ्यातील मास्टरमाइंड BARC चे माजी CEO अटकेत; मुंबई क्राईम ब्रँचने पुण्यात केली कारवाई

TRP घोटाळ्याप्रकरणी मुंबई क्राइम ब्रँचने मोठी कारवाई करत BARC माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पार्थो दासगुप्ता (Partho Dasgupta) यांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे.

    मुंबई, 25 डिसेंबर : टीआरपी घोटाळ्यातील (TRP Fraud) मास्टरमाइंड आणि बीएआरसीचे (BARC) माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांना  मुंबई पोलिसांनी पुण्यातून अटक करण्यात आली आहे. टीआरपी घोटाळा प्रकरणात ही 15 वी अटक आहे. या प्रकरणात एका प्रतिस्पर्धी वृत्त वाहिनीचं रेटिंग वाढवून  CNN न्यूज 18 आणि इतर वाहिन्यांचं रेटिंग कमी दाखवल्याचा आरोप आहे. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने त्यांना अटक केल्याची बातमी समोर आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने पुणे (Pune) जिल्ह्यातील राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ही अटक केली असून पोलीस त्यांना शुक्रवारी मुंबई न्यायालयात हजर करतील. दासगुप्ता हे बीएआरसीशी संबंधित दुसरे व्यक्ती आहे ज्यांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. यापूर्वी या प्रकरणात BARC चे माजी COO रामिल रामगडिया यांना अटक करण्यात आली होती. बनावट टीआरपी घोटाळ्याचं प्रकरण यावर्षी ऑक्टोबरमध्ये समोर आले होते. रेटिंग एजन्सी बार्कने काही टीव्ही चॅनेलच्या टीआरपी रेटिंगमध्ये फेरफार केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर याबाबात तक्रार दाखल करण्यात आली होती. बीएआरसीने हंसा या संस्थेला काही घरात टीव्ही व्यूअरशिप नोंदविणारे बॅरोमीटर लावण्याचे काम दिले होते. या प्रकरणात CNN न्यूज 18 नेही प्रतिस्पर्धी वृत्त वाहिन्यांचं रेटिंग चुकीच्या पद्धतीने वाढविल्याचा आरोप केला आहे. काय आहे बार्कचं म्हणणं... बीएआरसी (BARC) इंडियाच्या माजी कर्मचार्‍यांशी संबंधित चौकशी सुरू असून हा तपासाचा एक भाग आहे. यामध्ये बार्क व्यवस्थापन कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या संस्थांना सहकार्य करीत आहे. परिणामी या टप्प्यावर बीएआरसीने या संदर्भात आणखी काही भाष्य करणे अयोग्य असेल. बीएआरसी इंडियाच्या प्रत्येक कर्मचार्‍याने आचारसंहितेचे पालन करणे अपेक्षित आहे.  भारतातील नागरिक काय पाहतात याबाबत याबाबत आम्ही दक्ष आहोत. याशिवाय आमच्या सर्व भागधारकांची ही जबाबदारी आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Mumbai

    पुढील बातम्या