गुवाहाटी, 9 नोव्हेंबर : आसाममध्ये एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आसाम पोलीस रेडिओ संस्था (APRO) यांनी एका पोलिसाला त्याने टोपी घातली म्हणून निलंबन केल्याची घटना समोर आली आहे. या व्यक्तीचे नाव शौकत अली असून असून ते APRO मध्ये सबइन्स्पेक्टर म्हणून काम करीत होते. त्यांनी मुस्लीम धर्माविषयी विश्वास दर्शविणारी टोपी घातल्याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर संस्थेने त्यांना निलंबित केलं.
याबाबत Inside Northeast मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार याबाबत ADGP एस एन सिंह यांनी सांगितलं की, अमिनगाव येथे शौकत अली यांचा फोटो क्लिक केला होता. ते पुढे म्हणाले की, शौकत नमाज नंतर टोपी काढायला विसरले. त्यांनी दिसपूर येथे कॉर्डिनेशन सेंटरला याबाबत कळवलं आहे. युनिफॉर्म कोड अंतर्गत त्यांचं निलंबन करण्यात आलं असून हे अत्यंत गंभीर उल्लंघन आहे.
हे ही वाचा-या मुस्लीम देशात Live in relationship ला परवानगी, दारूवरचे निर्बंध शिथिल,
या निलंबनामुळे आसाममध्ये मोठा विरोध व्यक्त केला जात आहे. अशा प्रकारची शिक्षा देणं योग्य नसल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील एका दाढी असलेल्या पोलिसाचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. दाढी काढल्यानंतरही नोकरीवर रुजू व्हावे असा आदेश त्यांना देण्यात आला होता. शौकत यांनी केलेल्या चुकीसाठी ही खूप गंभीर शिक्षा देण्यात आली असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. जर चुकून टोपी काढायची राहिली असेल तर अशी शिक्षा दिली जाऊ नये अशा प्रतिक्रिया येत आहेत. तर दुसरीकडे शौकत यांनी कॉर्डिनेटशन सेंटरला त्यांच्यासोबत झालेला नेमका प्रकार सांगितला आहे.